भोपाळ : वृत्तसंस्था
सोशल मीडियाच्या युगात लहानापासून ते वरिष्ठपर्यंत सध्या मोबाईल १० मिनिटे सुद्धा दूर ठेवायचे नाही म्हणतात, मोबाईल जितका आपल्या आयुष्यात महत्त्वाचा आहे तितकाच तो जीवासाठी धोकादायकही आहे. तुम्हाला मोबाईल ब्लास्ट झाल्याची काही प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. अशाच एका घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. एका तरुणाच्या हातातच मोबाईलाच ब्लास्ट झाला आहे. ही भयंकर दुर्घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
मोबाईल रिपेअरिंग दुकानातील ही घटना आहे. दुकानातील तरुण मोबाईलची बॅटरी काढण्याचा प्रत्न करत होती त्याचवेळी मोबाईलचा स्फोट झाला आणि मोबाईलमधून निघालेली आग एका व्यक्तीच्या तोंडावर बसली.
व्हिडीओत पाहू शकता एक तरुण मोबाईलच्या दुकानात आहे. एक व्यक्ती त्या दुकानात येतं. दोघंही आपसात बोलत असतात. त्यावेळी तरुण दुकानातील एक मोबाईल हातात घेतो आणि त्याची बॅटरी काढायला जातो. मोबाईलच्या मागील कव्हर उघडण्याचा तो प्रयत्न करत असतो तोच मोबाईलचा अचानक ब्लास्ट होतो.
युवक के हाथ में फटा मोबाइल फोन, कैमरे में कैद हुई घटना.. pic.twitter.com/y2TyVxoSNu
— Ayush Kumar (@kumarayush084) August 18, 2022
तरुणाच्या हातातच मोबाईलचा स्फोट होतो, मोबाईलमधून आग भडकताना दिसते. ही आग समोर उभ्या असलेल्या व्यक्तीच्या तोंडावर बसते. ती व्यक्ती तशी जीव मुठीत धरून दुकानातून बाहेर पळते. तर तरुणही हातातील मोबाईल फेकून देतो.
ब्लास्ट होताच तरुण लगेच हातातील मोबाईल आपल्यापासून दूर फेकतो म्हणून सुदैवाने त्याला काही झालं नाही आणि आग लगेच विझवल्याने काही मोठी दुर्घटनाही टळली. ही घटना मध्य प्रदेशच्या कनकीमधील असल्याचं सांगितलं जातं आहे. @kumarayush084 ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.