जळगाव मिरर । १२ ऑक्टोबर २०२२
मोदी सरकारच्या मंत्री मंडळात आज मोठा निर्णय घेण्यात आला. यंदाची दिवाळी रेल्वे कर्मचाऱ्यांची धूम धडाक्यात साजरी करता येणार आहे. कॅबिनेट मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगतिले कि, रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस दिला जाणार असून, 11.27 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना 1,832 कोटी रुपयांचा उत्पादकता लिंक्ड बोनस दिला जाणार आहे. याची कमाल मर्यादा 17,951 रुपये अशी घोषणा त्यांनी यावेळी केली आहे.
बोनसच्या निर्णयासह आजच्या बौठकीत तेल वितरण कंपन्यांना 22,000 कोटी रुपयांचे एकरकमी अनुदान देण्यासह मंजूरी देण्यात आली आहे. जगभरात एलपीजीच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे सामान्यांनावर आर्थिक ताण पडत आहे. ही तूट भरून काढण्यासाठी आणि वाढत्या किमतींचा बोजा सामान्यांवर न पडण्यासाठी तेल विपणन कंपन्यांना 22,000 कोटी रुपयांचे एकरकमी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील नागरिकांवर पेट्रोलियम पदार्थांच्या वाढत्या किमतींचा बोजा पडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
पत्रकार परिषदेत म्हणाले की, गुजरातमधील कांडला येथे दीनदयाल बंदर प्राधिकरणाअंतर्गत कंटेनर टर्मिनल आणि बहुउद्देशीय कार्गो बर्थ बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सुमारे 6 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. याशिवाय पूर्वोत्तर राज्यांमध्ये पायाभूत सुविधा आणि इतर सामाजिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी PM-devine योजना मंजूर करण्यात आली आहे.