
जळगाव मिरर | २८ मार्च २०२६
जामनेर तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध जामनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २७ मार्च रोजी सकाळी सुमारे ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित दहा वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या घरी एकटी असताना कपडे बदलत होती. यावेळी संशयित आरोपीने संधी साधून घरात प्रवेश केला आणि मुलीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. घटनेनंतर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कुटुंबीयांनी तात्काळ जामनेर पोलीस स्थानकात धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत पुढील कारवाई सुरू केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील शिंदे करीत असून आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, अशा प्रकारच्या घटनांमुळे पालकांनी आपल्या मुलांच्या सुरक्षिततेबाबत अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.





















