मेष : आज दिवसभर तुमचे मन आनंदी राहील. काही नवीन व्यवसायाचे प्रस्ताव मिळू शकतात. शासकीय कामात मोठ्या व्यक्तीची मदत मिळेल. पैसे कमावण्याच्या चांगल्या संधी मिळतील. कुटुंबियांसोबत मोकळा वेळ घालवाल. मित्र तुमच्याकडून कोणत्याही बाबतीत सल्ला घेऊ शकतात. जोडीदाराला तुमचा वेळ द्या. कौटुंबिक संबंध दृढ होतील.
वृषभ : आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा आहे. आज कुटुंबातील वातावरण आनंददायी असेल. तुमच्या मनातील एखादी इच्छा पूर्ण होईल. नोकरीत असलेल्या लोकांना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. मनातील योजना कुणालाही सांगू नका, अन्यथा त्यांचा फायदा घेतला जाईल. आर्थिक गोष्टींमध्येही काळजीपूर्वक निर्णय घ्या.
मिथुन : आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. नकारात्मक विचार टाळा. व्यवसायात जास्त मेहनत घ्यावी लागेल. आरोग्याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. अनावश्यक खर्च वाढतील. साठवलेला पैसा खर्च होऊ शकतो. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. एखाद्या व्यक्तीसोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात. बोलण्यात संयम बाळगा.
कर्क : आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. महत्त्वाचे निर्णय आजच घ्यावे लागतील. मनातील विचारांच्या गोंधळामुळे तणाव आणि अस्वस्थतेचा सामना करावा लागू शकतो. परदेशात व्यापार् करणाऱ्यांना धनहानी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे या दिवशी सावधपणे आणि विचारपूर्वक निर्णय घ्या. रागावर नियंत्रण ठेवा. एखाद्या बाबतीत आज तुमचा गैरसमज होऊ शकतो.
सिंह : आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत काळजीचा असणार आहे. कार्यक्षेत्रात किंवा घरात नुकसान होण्याची शक्यता आहे, प्रत्येक काम काळजी घेऊनच करा. आज कोणत्याही व्यवसायात गुंतवणूक करू नका किंवा अनावश्यक गोष्टींवर पैसा खर्च करू नका. आर्थिक बाबतीत थोडीशी प्रगती होईल. काठीर प्रयत्नांना फळ मिळेल. सरकारी कामात सहकार्य मिळेल.
कन्या : आजचा दिवस तुम्च्य्साठी आनंदाचा असणार आहे. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास व्यवसायात वाढ होईल. उत्पादन कार्य देखील वाढू शकते. अधिकाऱ्यांशी समन्वय साधावा लागेल. कुटुंबात तुमच्या गुणांची प्रशंसा होईल. संगीत क्षेत्राशी निगडित व्यक्तींना आपली कला सादर करण्याची संधी मिळेल. जीवनसाथीसोबत मतभेद होऊ शकतात. आरोग्य चांगले राहील.
तूळ : आजचा दिवस तुमच्यासाठी खास असणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नोकरीची नवीन ऑफर येऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठ्या नफ्याच्या लालासेकडे दुर्लक्ष करावे लागेल. एखाद्या मंगल कार्याला हजेरी लावाल. ऑफिसमध्ये काम करणारे लोक व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून सहलीला जाऊ शकतात. मित्राकडून काही चांगली माहिती ऐकायला मिळेल.
वृश्चिक : आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र फलदायी असणार आहे. आज तुमच्यात खूप आत्मविश्वास असेल. पण तरीही मन अस्वस्थ होऊ शकते. नोकरीत अधिकाऱ्यांशी विनाकारण वाद टाळा. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. आरोग्याची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी बदल घडण्याची शक्यता आहे. अभ्यासात रस वाढेल. उत्पन्नात कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती उद्भवेल.
धनु : आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असणार आहे. आर्थिक जीवनात आज आनंद राहील. याच्या मदतीने तुम्ही कर्जापासून मुक्त होऊ शकता. घरातील कामांमध्ये व्यस्त राहाल. जोडीदाराला नेहमी समजून घेण्याचा प्रयत्न करा. घरामध्ये एखाद्या मंगल कार्याचे आयोजन केले जाईल. अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करताना नीट विचार करा.
मकर : आजच्या दिवशी तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. तुमच्या एखाद्या छोट्याशा चुकीमुळे कुटुंबाच्या प्रतिष्ठेवर वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे आज घरगुती वातावरण अशांत राहील. कार्यक्षेत्रातील मंदीनंतरही गरजेनुसार नफा नक्कीच मिळेल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी एकदा नफा-तोट्याचा आढावा नक्की घ्या. वडीलधाऱ्यांचे सहकार्य मिळेल.
कुंभ : धनप्राप्तीसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. जुन्या मित्रांना भेटून तुम्हाला आनंद होईल. व्यवसाय करणार्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. तुमचे काही अनुभव क्षेत्रातील काही लोकांना उपयोगी पडू शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी कोणताही किरकोळ फायद्याचा सौदा हाताबाहेर जाऊ देऊ नये. तुम्ही एखाद्या मंगल कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.
मीन : तुमचा दिवस चांगला जाईल. काही महत्त्वाचे काम पूर्ण होऊ शकते. आर्थिक बाजूत सुधारणा होईल. आई-वडिलांच्या पाठींब्याने आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न कराल. एखादा जुना मित्र तुम्हाला अचानक घरी भेटायला येऊ शकतो. वैवाहिक जीवन चांगले होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. अनावश्यक पैसा खर्च करण्यावर बंधने घालावी लागतील.



















