जळगाव मिरर | ४ सप्टेंबर २०२५
आई कामाला गेलेली होती, तर भाऊ शिकवणीसाठी गेलेला असताना घरी एकटीच असलेल्या जयश्री लक्ष्मण चव्हाण (वय १५, रा. रामेश्वर कॉलनी) या मुलीने राहत्या घरामध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना दि. २ सप्टेंबर रोजी रात्री उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील रामेश्वर कॉलनीत जयश्री चव्हाण ही मुलगी आई व भाऊ यांच्यासोबत राहत होती. दि. २ सप्टेंबर रोजी तिची आई कामावर गेलेली होती तर लहान भाऊ शिकवणीला गेलेला होता. संध्याकाळी जयश्रीने शेजारील मुलींसोबत गणपतीसाठी दुर्वा तोडल्या नंतर पाय दुखत असल्याने स्वतःसाठी गोळ्या आणल्या. त्यानंतर तिने घरात गळफास घेतला. तिचे आजोबा घराकडे गेले त्या वेळी ही मुलगी गळफास घेतल्याचे दिसले. तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोउनि अशोक काळे करीत आहेत. मुलीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.