जळगाव मिरर | २६ मार्च २०२५
अनेक छोट्या मोठ्या शहरात गुन्हेगारी घटनांसह अत्याचाराच्या घटना वाढत असताना आता नाशिक शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली आहे. नाशिकच्या ओझर टाऊनशिपमध्ये ही घटना घडली. या प्रकरणात पाच संशयित आरोपी फरार आहेत. नाशिक पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे. पोलिसांचे पथक आरोपींच्या मागावर आहे. मुलगी घरात एकटी असल्याचे बघून नराधमांनी हे अत्याचाराच कृत्य केलं. आई मजुरी काम करण्यासाठी गेलेली असताना, आरोपीने घरात घुसून हे कुकर्म केलं. कोणाला सांगितल्यास मारून टाकण्याची धमकी दिली आहे.
मागच्या आठवड्यात नाशिकमध्ये जाधव बंधुंची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उमेश जाधव आणि त्यांचे बंधू प्रशांत जाधव यांची रंगपंचमीच्या दिवशी हत्या करण्यात आली होती रात्रीच्या सुमारास टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला करुन जाधव बंधूंचा खून केला होता. पोलिसांनी काही तासातच खुनातील या सर्व आरोपींना ताब्यात घेतले होते. न्यायालयात हजर केल्यानंतर तपासासाठी पुन्हा एक दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. उमेश जाधव हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी होते.
कोयता घेऊन आलेल्या हल्लेखोरांनी सार्वजनिक शौचालयासमोरच जाधव बंधुंवर भीषण हल्ला केला. अनेक वार अंगावर झाल्याने दोघे बंधु तिथेच रक्ताच्या थारोळ्या कोसळले. ही घटना घडल्यानंतर स्थानिकांनी दोघा बंधुंना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात नेलं. पण तिथे डॉक्टरांनी तपसाल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने दोघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली होती.




















