अमळनेर : विक्की उत्तम जाधव
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवारी दिनांक 9 डिसेंबर 2023 रोजी राष्ट्रीय लोक अदालतेचे आयोजन जळगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात करण्यात आले होते. लोकअदालतेत एका मोटर अपघात नुकसान भरपाई प्रकरणी 80 लाख रुपयाची तडजोड यशस्वीरित्य दोन्ही पक्षांमध्ये लोकन्यायालयासमोर करण्यात आली.
मूळ चाळीसगाव येथील रहिवाशी जयश्री हेमंत चौधरी यांचे पती हेमंत विष्णू चौधरी यांचा दिनांक 25/1/2021 रोजी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत रस्ता अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. अपघाताची तीव्रता एवढी गंभीर होती की मयत हेमंत विष्णू चौधरी यांचा घटनास्थळावरच दुर्दैवी मृत्यू झाला होता. सदरचा अपघात हा सामने वाला गाडी चालक साबीर खान मोहम्मद खान त्यांच्या बेजबाबदार व निष्काळजीपणामुळे झाले असल्याने , व अपघाताला सर्वस्व सामने वाला गाडी चालक व मालक जबाबदार असल्याने अर्जदार यांनी सामने वाला गाडी चालकाविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद नोंदवली. सदर फिर्यादीच्या अनुषंगाने सामने वाला गाडी चालकाविरुद्ध भा द वी कलम ३०४(A) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला.
मयत हे घटनेच्या वेळी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी येथे कायमस्वरूपी यंत्र चालक या पदावर कार्यरत होते. मयत हे घरातील एकमेव कमावते व्यक्ती असल्यामुळे मयत यांचे वारस जयश्री हेमंत चौधरी (पत्नी) त्यांचे दोन अज्ञान मुली ज्यांचे वय केवळ आठ व दहा वर्षे आहे मयताचे वडील विष्णू देवचंद चौधरी व आई यांनी जळगाव येथील मोटर अपघात दावा प्राधिकरणात ॲड महेंद्र सोमा चौधरी व त्यांचे सहकारी मार्फत मोटार अपघात नुकसान भरपाई मिळणे कामी 2021 साली दावा दाखल केला. सदर दावा हा सामने वाला गाडी चालक , गाडी मालक वाहन क्रमांक – MH 04 HD 4074 दीपक काशिनाथ गायकवाड व सामने वाला गाडी यांचा इन्शुरन्स कंपनी चोलामंडलम यांच्याविरुद्ध दावा दाखल केला. सदर दावा सुरू असताना विमा कंपनीने देखील त्यांचा जबरदस्त बचाव मेहरबान प्राधिकरणासमोर मांडला.
सदरचा दावा हा मोटर अपघात दावा प्राधिकरणाचे सदस्य व जिल्हा न्यायाधीश – ४ जे जे मोहिते यांच्या समक्ष कामकाज सुरू असताना सदरचे प्रकरण हे दिनांक 9 डिसेंबर 2023 रोजीच्या लोकन्यायालयात दोन्ही पक्षांच्या संमतीने व अर्जदारांचे वकील ॲड महेंद्र सोमा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली लोक न्यायालयात ठेवण्यात आले.
त्याअनुषंगाने राष्ट्रीय लोक अदालतेच्या दिवशी चर्चेअंती सदर प्रकरणात विमा कंपनीने नुकसान भरपाई पोटी ऐंशी लाख रुपये (८०,००,०००) नुकसान भरपाई देण्याचे संमती अर्जदारांना दर्शवली. सदर प्रकरणी अर्जदारां तर्फे ॲड महेंद्र सोमा चौधरी , ॲड श्रेयस महेंद्र चौधरी, ॲड हेमंत जाधव , ॲड सुनील चव्हाण, यांनी बाजू मांडली . व सामने वाला विमा कंपनी चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी तर्फे योगेश धसे , ॲड अनिल चौगुले, ॲड प्रसाद गोडबोले यांनी कामकाज पाहिले.
घरातील एकुलता एक करता व्यक्ती अचानकपणे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने घरातील सासू सासरे व लहान मुलींची जबाबदारी ही मयताची पत्नी जयश्री हेमंत चौधरी हिच्या एकटीवर आल्याने व मयताचे वयोवृद्ध वडील विष्णू देवचंद चौधरी यांच्यावर आल्याने सदर नुकसान भरपाईमुळे संपूर्ण कुटुंबाला आर्थिक आधार मिळेल व नुकसान भरपाई पोटी मिळालेली रक्कम अज्ञान मुलींच्या भविष्यासाठी व त्यांच्या शिक्षणासाठी उपयोगी येईल व वयोवृद्ध सासू सासऱ्यांचे सेवा शुष्रता करण्यात सदर रकमेचा सदुपयोग होईल असं कोर्टाशी बोलताना सांगितले. संपूर्ण कोर्टकचेरीचे काम हे कमीत कमी वेळेत झाल्याने व एक ठोक रक्कम मिळाल्याने अर्जदाराला समाधान होते. त्याकरिता अर्जदारांनी राष्ट्रीय लोक अदालत याचे जळगाव येथे यशस्वीरित्या आयोजन केल्याबद्दल जळगाव येथील विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश एस पी सय्यद साहेबांचे व लोकन्यायालयाचे पॅनल क्रमांक दोन चे पॅनल प्रमुख – एस व्ही केंद्रे – तदर्थ जिल्हा न्यायाधीश – १ जळगाव व पॅनलचे सदस्य ॲड हेमंत रघुनाथ गिरणारे यांचे आभार मानले.