जळगाव मिरर | संदीप महाले
शहरातील प्रभाग क्र.१ मधील इंद्रप्रस्थ नगर – शिव शंकर कॉलनी जवळील एका मोठ्या नाल्याची साफसफाई झाली नसल्याचे वृत्त ‘जळगाव मिरर’ ने दि.७ ऑगस्ट रोजी प्रकाशित केले होते. त्यानंतर जळगाव मनपातील आरोग्य विभागाला जाग आली असून केवळ २४ तास होण्यापूर्वीच या कामाला सुरुवात केली आहे.
जळगाव शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पावसाळा येण्यापूर्वी शहरातील ५ मुख्य नाले व शहरातील १०२ उपनाल्याची साफसफाई मोहीम करण्यात येत असते. यंदा देखील ही मोहीम करण्यात आली. मे व जून या महिन्यात ही मोहीम ठेकेदाराच्या माध्यमातून करण्यात आली होती मात्र या मोहिमेला एक महिना पूर्ण होत नाही तोच आता शहरातील प्रभाग क्र.१ म्हणजेच इंद्रप्रस्थ नगर मागील सिद्धीविनायक कॉलनी, लक्ष्मी नगर व शिव शंकर कॉलनी परिसराला लागून एक मोठा नाला आहे. याठिकाणी आज दि.७ ऑगस्ट रोजी पहिले असता. याठिकाणी कुठल्याही प्रकारची साफसफाई करण्यात आले नसल्याचे दिसून आले होते. त्यानंतर ‘जळगाव मिरर’ने हे वृत्त प्रकाशित केल्यानंतर मनपातील आरोग्य विभागाला खळबळून जाग आली आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी याठिकाणी जेसीबीच्या माध्यमातून काम सुरु झाले होते.
नालेसाफ सफाई मोहीम केवळ फोटो पुरता का ?
पावसाळ्यापूर्वी जळगाव शहरातील ५ मुख्य नाले व १०२ उपनाल्यांची साफसफाई मोहीम करण्यात येत असते. हि मोहीम पावसाला येण्यापूर्वी झाली असल्याचे समजते. मात्र जर नाले साफ झाले आहे तर आता इतकी घाण झाली कशी ? म्हणजे हि मोहीम केवळ फोटो काढण्यापुरता होती का ? असा देखील प्रश्न आता उपस्थित होत आहे.
पुढील भागात सविस्तर योजनेची माहिती व संशयांच्या भोवऱ्यात का ?