जळगाव मिरर | १२ मार्च २०२५
काशी एक्सप्रेसने ते जळगावला येण्यासठी निघाले असलेल्या रविंद्र साहेबराव पाटील (वय ५८, रा. शिवाजीनगर) या मनपा कर्मचाऱ्याचा धावत्या रेल्वेतून पडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म दोनवर घडली. याप्रकरणी रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शिवाजी नगरात राहणारे रविंद्र पाटील हे महापालिकेत नोकरीस होते. काशी एक्सप्रेसने ते जळगावला येण्यासठी निघाले होते. हा एक्सप्रेस जळगाव रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म दोनवर येत असतांना अचानक त्यांचा रेल्वेतून तोल जावून ते खाली कोसळले. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिस उपनिरीक्षक अनिल नगराळे, पोहेकॉ हिरालाल चौधरी व किरण पाटील यांनी तत्काळ प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. रेल्वेतून पडून मयत झालेल्या रविंद्र पाटील यांच्या खिशात ओळखपत्र मिळून आल्यामुळे त्यांची ओळ पटली. रविंद्र पाटील हे महापालिकेत नोकरीस होते. घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबियांना मिळताच त्यांच्या मुलाने तात्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. वडीलांचा मृतदेह बघताच त्यांनी एकच आक्रोश केला.
मयत रविंद्र पाटील यांच्या खिशात ओळखपत्रासह मथुरा ते जळगाव असे तिकीट मिळून आले. घरापासून अवघ्या काही अंतरावर रेल्वेतून पडल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास उपनिरीक्षक अनिंद्र नगराळे करत आहेत.