
जळगाव मिरर । ३ फेब्रुवारी २०२३।
जळगाव शहरातील एका उड्डाणपुलास रयतेचे राजे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव द्यावे अशा आशयाचे निवेदन मनपाचे महापौर कुलभूषण पाटील यांना देण्यात आले आहे.
शहरातील दादावाडी परिसरातील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले रामराज्य गृप यांनी नुकतीच शहर मनपाचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांना निवेदन सादर केले आहे. त्यात म्हटले आहे. कि, शहरातून धुळेकडे जाणाऱ्या मुख्यमहामार्गावर असलेल्या मानराज पार्क येथून सुरु झालेल्या उड्डाणपूल थेट खोटे नगर जवळ उतरत आहे.
या उड्डाण पुलास येत्या शिव जयंतीच्या मुहूर्तावर रयतेचे राजे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज हे नामकरण देण्याची मागणी नागरिकांनी व रामराज्य ग्रुप दादावाडी यांनी केली आहे. यानिवेदानावर रामराज्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष नितीन जाधव, प्रवीण पाटील, परितोष बोरनारे, प्रशुम भोळे, देवेश बीरपण, अक्षय जाधव, शेखर पाटील, हितेश बागुल, धीरज पाटील, निलेश पाटील यांच्यासह परिसरातील नागरिकांनी स्वाक्षरी आहेत.




















