जळगाव मिरर / ८ डिसेंबर २०२२
जागतिक दिव्यांग दिनाच्या निमीत्ताने रेडक्रॉस जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र जळगाव व जिल्हा समाजकल्याण विभाग जिल्हा परीषद जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी दिन विशेष साजरा करण्यात येत असतो.
सदर दिन विषयाचे औचित्य साधून जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींनी केलेल्या उल्लेखनीय व विशेष कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात येते. तसेच दिव्यांगांसाठी उल्लेखनीय व विशेष कार्य करणा-या संस्था व व्यक्ती यांना देखील सन्मानीत करण्यात येते. या निमित्ताने दिव्यांगांसाठी भरीव कामगिरी करणाऱ्या नारीशक्ती बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष मनिषा पाटील यांना विनोद बियाणी समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंगे, भरत दादा चौधरी ,घनश्याम महाजन यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. ह्या प्रसंगी नूतन तास खेडकर संगीता चौधरी, भाग्यश्री महाजन, मरियम बुगडवाला, किमया पाटील, विद्या जकातदार हे उपस्थित होते.