जळगाव : प्रतिनिधी
हिंदू धर्मात नवरात्री अर्थात घटस्थापने दरम्यान संपूर्ण देशभरात देवीची पूजा केली जाते. नवरात्री दरम्यान नऊ दिवस उपवास व देवीची पूजा अर्चना करतात. नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग कोणत्या दिवसापासून नवरात्र सुरू होतो यावर आधारित असतो. श्रीकृष्णाचा अत्यंत प्रिय रंग…कृष्णाने नेसलेलं पितांबर…पिवळं रेशमी वस्त्र…सौभाग्याचा, संपत्तीचा आणि वैभवाचा निदर्शक मानला जाणारा हा पिवळा रंग आहे. दरम्यान, वाचक ‘जळगाव मिरर’ला पाठवा आपल्या महिला मंडळाचे फोटो पाठवू शकतात. मंडळाचे फोटो आणि उपक्रमांना आम्ही प्रसिद्धी देणार आहोत. फोटो आणि बातम्या पाठवण्यासाठी सागर कुटूबळे 9158323490 या नंबरवर संपर्क करा !
आजचा फोटो : केंद्रिय विद्यालयातील महिला मंडळाचा !
नवरात्री निमित्त कवयित्री बहिणाबाई विद्यापीठ येथील केंद्रिय विद्यालयात समस्त महिला शिक्षिकांनी नवरात्रीचा चौथा पिवळा रंग परिधान करून नवरात्री निमित्त देवीच्या आगमनाचे विद्यालयात महत्व प्राप्त करून दिले. यामिनी सरीदे, इंद्रायणी वडसत्ते, प्रणिती सोनवणे, मीनाक्षी आर.पाटील, नीता कुलकर्णी, पूनम जामधडे, मीनाक्षी एम पाटील, लक्ष्मी सोनवने, अमिता निकम, प्रीती सोज्वळ, पियाली पुरोहित, अश्विनी खरात, शैलजा मीना, विद्या हिवराडे, थोरात यांनी आजचा पिवळा रंग असल्याने सर्वांनी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून आई भवानीची प्रार्थना केली.
उद्याचा रंग : हिरवा