जळगाव मिरर | ३० जानेवारी २०२६
दरवर्षीप्रमाणे यंदाही जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक एकमधील छत्रपती बजरंग मित्र मंडळाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मंडळाची यंदाची कार्यकारणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली असून, अध्यक्षपदी पंकज सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे.
नवीन कार्यकारणीमध्ये उपाध्यक्षपदी गिरीश जाधव आणि राहुल भगत, कार्याध्यक्षपदी दीपक सोनवणे, खजिनदारपदी आकाश चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. तसेच सचिवपदी राकेश सुरवाडे, कल्पेश आर. के. आणि कुणाल हटकर यांची जबाबदारी देण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांची निवड एकमताने करण्यात आली असून, या निवडीचे प्रभाग क्रमांक एकमधून सर्वत्र स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे. नव्या कार्यकारणीच्या माध्यमातून यंदाचा शिवजयंती उत्सव अधिक उत्साहात, शिस्तबद्ध व सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी मंडळावर सोपवण्यात आलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत शिवजयंती उत्सव अधिक भव्य व अर्थपूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.




















