नेहमी प्रमाणे वर्षाच्या शेवटच्या महिन्यात भरपूर बदल होत असतात अशातच आज १ डिसेंबर पासून सुरु होत आहे. अनेक नवीन नियम लागू होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. प्रत्येक महिन्याप्रमाणे 1 डिसेंबरपासून एलपीजी, पीएनजी आणि सीएनजीच्या किमतीत बदल होऊ शकतो, तर अनेक पेन्शनधारकांनी 30 नोव्हेंबरपर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यास अडचणी येऊ शकतात. 1 डिसेंबरपासून कोणते नियम बदलणार आहेत आणि त्यांचा तुमच्यावर कसा परिणाम होऊ शकतो हे जाणून घ्या.
LPG, CNG, PNG किमतीत बदल
गॅस सिलिंडरची किंमत गेल्या दर महिन्याच्या 1 तारखेला बदलते. गेल्या महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. अशा परिस्थितीत 1डिसेंबरपासून एलपीजी सिलिंडर स्वस्त (LPG cylinder cheap) होण्याची शक्यता आहे.
पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र
पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2022 होती. त्यामुळे 1 डिसेंबरपर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करणार्या पेन्शनधारकांना पेन्शन मिळण्यात अडचणी येऊ शकतात.
13 दिवस बँकांना सुट्ट्या
डिसेंबरमध्ये एकूण 13 दिवस बँकांना सुट्ट्या असणार आहे.यामध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार आणि रविवारचा समावेश आहे. याशिवाय, डिसेंबर महिन्यात ख्रिसमस, वर्षाचा शेवटचा दिवस 31 डिसेंबर आणि गुरु गोविंद सिंग जी यांची जयंती असल्यामुळे सुट्ट्या आहेत.
पैसे काढण्याच्या पद्धतीत बदल
डिसेंबर महिन्यापासून एटीएममधून पैसे (Money from ATM) काढण्याच्या नियमांमध्येही बदल होऊ शकतो. पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) डिसेंबरमध्ये एटीएममधून पैसे काढण्याच्या प्रक्रियेत बदल करू शकते. 1 डिसेंबरपासून, तुम्ही एटीएममध्ये कार्ड (ATM Card) टाकताच तुमच्या मोबाईल (Mobile) नंबरवर एक ओटीपी जनरेट (Generate OTP) होईल. एटीएम स्क्रीनवर दिलेल्या कॉलममध्ये हा ओटीपी टाकल्यानंतरच रोख रक्कम (Cash amount) दिली जाईल.
अनेक गाड्यांच्या वेळेत बदल
डिसेंबर महिन्यात हिवाळा वाढू शकतो आणि अशा परिस्थितीत गाड्यांच्या वाहतुकीत अडचणी निर्माण होतात. त्यामुळे रेल्वेकडून अनेक गाड्यांच्या वेळेत बदल केला जाऊ शकतो. धुके पाहता रेल्वेनेही वेळापत्रकात बदल केला आहे. रेल्वे नवीन वेळापत्रकानुसार गाड्या चालवण्याची शक्यता आहे.