चाळीसगाव : कल्पेश महाले
भडगाव तालुक्यातील वाडे ग्रामपंचायतीच्या सरपंच रजुबाई यशवंत पाटील यांच्या विरोधात १२ ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव बाबतचे निवेदन तहसीलदार मुकेश हिवाळे यांना दिले.
निवेदनात नमूद केले आहे की, सरपंच रजुबाई यशवंत पाटील मनमानी करतात. ग्रामपंचायतीच्या कामत अडथळा आणतात. ग्रामपंचायतीच्या सदस्यांना विश्वासात घेत नाहीत. यासाठी पुढील सभेत अविश्वास ठराव करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही निवेदनात नमूद केले आहे.
निवेदनावर उपसरपंच अलका गोरख भिल, सदस्य संगीता रवींद्र माळी, नलिनी परशुराम माळी, आशा भूषण मोरे, ललिता नाना माळी, निर्मला जुलाल माळी, रवींद्र जगन सोनवणे, रवींद्र हिरामण चौधरी, नवल एकनाथ पाटील, रोशन शामसिंग परदेशी, प्रदीप भास्कर भिल, गुलाब रमेश पाटील यांच्यासह १२ ग्रामपंचायत सदस्यांच्या सह्या आहेत. या निर्णयाने गावात एकच चर्चा होत आहे.