अमळनेर : विक्की उत्तम जाधव
आगामी नगरपरिषद निवडणुकीत क्रियाशील झाल्यास भाजपाला सत्ता काबीज करण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही, संघटना काय असते हे भाजपाने वेळोवेळी सिद्ध केलेच आहे, असा विश्वास भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार स्मिताताई वाघ यांनी अमळनेर शहर भाजपच्या बैठकीत व्यक्त केली.
अमळनेर शहरातील भारतीय जनता पार्टीचे शक्तिकेंद्र प्रमुख, विस्तारक व बूथ प्रमुख यांची बैठक नुकतीच वाडी चौकातील संत सखाराम महाराज कार्यालयात पार पडली. आगामी काळात येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकी संदर्भात संघटनात्मक चर्चा करण्यासाठी ही बैठक असल्याने शहरातील सारेच शक्ती केंद्र प्रमुख, विस्तारक, बूथ प्रमुख आणि प्रमुख पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते यामुळे सभागृह हाऊस फुल्ल झाले होते. सुरवातीला प्रास्तविक शहराध्यक्ष उमेश वाल्हे यांनी करत संघटनात्मक बाबींचा आढावा मांडला यानंतर भाजपाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख शितल देशमुख, तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील व खा शि मंडळाचे माजी चेअरमन प्रभाकर कोठावदे यांनी मनोगत व्यक्त केले.
