जळगाव मिरर / १३ नोव्हेंबर २०२२
देशातील प्रत्येक व्यक्तीचे सोन्यावर भरपूर प्रेम असते हे जरी जगजाहीर असले तरी सण असला की प्रत्येक व्यक्ती त्याला जमेल तितकं सोन खरेदी करत असतात. भारतीय लोक शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापेक्षा सोनं विकत घेण्यास अधिक प्राधान्य देतात. कारण ही गोष्ट आपले आई-वडील हे पिढ्यानपिढ्या करत आले आहेत. मग आता आपण घरात किती सोनं ठेवू शकतो हे कोणालाही माहित नाही. त्यामुळे समजा जर तुमच्या घरी आयकर विभागानं धाड टाकली तर तुमचं किती सोनं जप्त केलं जाईल? आणि घरी किती सोनं ठेवू शकतो जाबाबत काही गोष्टी जाणून घेणं आवश्यक आहे. चला तर त्या विषयी जाणून घेऊया…
जाणून घ्या घरात किती सोने ठेवाल ?
घरातील प्रत्येक पुरुष व्यक्ती 10 तोळं सोनं ( 100 ग्रॅम ) ठेवू शकतात.
घरातील प्रत्येक अविवाहित महिलेसाठी 25 तोळं ( 250 ग्रॅम ) ठेवता येऊ शकते.
घरातील विवाहित महिला या 50 तोळं ( 500 ग्रॅम ) सोनं घरात ठेवू शकतात.
याशिवाय तुमच्याकडे पिढ्यांपिढ्या वारसा हक्कानं आलेलं सोन असेल तर त्यावेळी तुम्हाला त्याचे कागदपत्र दाखवावे लागतील. जर, तुमच्याकडे बिल किंवा अधिकृत पेपर नसतील तर हे सोनं जप्त होऊ शकतं. या सोन्यासाठी तुम्हाला सोन्यावर लॉन्ग टर्म कॅपिटल गेट टॅक्स देखील भरावा लागू शकतो.
या उदाहरणा प्रमाणे तुम्ही ठेवू शकतात
प्रियांश यांच्या घरात एकूण चार सदस्य आहेत. प्रियांश स्वतः, प्रियांशचा भाऊ सुमित, प्रियांशची पत्नी रिया आणि प्रियांशची अविवाहित मुलगी आर्या. प्रियांशला त्याच्या आईकडून मृत्युपत्रानुसार काही सोनं मिळालं आहे. या केसमध्ये प्रियांश घरी किती सोनं ठेवू शकतो आणि आयकर विभागाची कारवाई झाली तर किती सोनं जप्त होऊ शकतं?
A. दिव्याश – 100 ग्रॅम
B. दिव्याशचा भाऊ सुमित 100 ग्रॅम
C. दिव्याशची पत्नी रिया 500 ग्रॅम
D. दिव्याशची अविवाहित मुलगी 250 ग्रॅम
E. आईकडून मृत्युपत्रानुसार मिळालेलं 150 ग्रॅम सोनं
घरातील एकूण सोनं 1350 ग्रॅम
अशात वरील उदाहरणानुसार जर घरात 1350 ग्रॅम सोनं आढळल्यास नियमांनुसार A+B+C+D+E एकत्र केल्यास 1100 ग्रॅम सोनं जप्त केलं जाणार नाही मात्र घरात एकूण 1350 ग्रॅम सोनं आढळल्यास एकूण सोन्यापैकी 250 ग्रॅम सोनं जप्त करण्यात येऊ शकतं.