जळगाव मिरर | ३० जानेवारी २०२६
भुसावळ तालुक्यातील वरणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेत पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या पीडित मुलीशी दि. 26 जानेवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास आरोपीने तिच्या घरात शिरून अश्लील कृत्य केले. यावेळी पीडितेच्या ९ वर्षीय लहान बहिणीला कोणीही सांगितले तर जीवे ठार मारून टाकेल अशी धमकी दिली. घटना घडल्यावरही आरोपी थांबला नाही. दि. २८ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास शाळेत जात असलेल्या पीडित मुलीचा रस्ता अडवून, तिच्यासोबत अश्लिल कृत्य केले. पीडितेने याबाबत कुटुंबियांना सांगितल्यानंतर त्यांनी वरणगाव पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयिताविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश बेडकोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.




















