
जळगाव मिरर / ११ नोव्हेंबर २०२२
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील अभियांत्रिकीच्या पदवीच्या द्वितीय वर्षाच्या तिसऱ्या सत्राची परीक्षा २ वेळा होणार आहे. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळेल याबाबतचे निवेदन युवासेनातर्फे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांना देण्यात आले.
अभियांत्रिकी विषयाच्या पदवी परीक्षेची सध्या सत्र परीक्षा सुरू होत आहे. अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाच्या तिसऱ्या सत्राची परीक्षा दोन वेळा घेण्यात येणार आहे. तरी ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, त्यामुळे परीक्षेला लागणारा खर्चही कमी लागेल आणि विद्यार्थ्यांना अभ्यासाला ही वेळ भरपूर मिळेल. याबाबतची मागणी कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांना युवासेना तर्फे करण्यात आली.
याबाबत माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन कुलगुरू डॉ. माहेश्वरी यांनी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. याबाबत पाठपुरावा सिनेट सदस्य तथा शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, युवा सेना जिल्हा युवा अधिकारी पियुष गांधी करीत आहेत. निवेदन देताना उपजिल्हा युवा अधिकारी विशाल वाणी, महानगर युवा अधिकारी अमोल मोरे, महानगर समन्वयक महेश ठाकूर, यश सपकाळे यांच्यासह अभियांत्रिकी द्वितीय वर्षाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















