जळगाव मिरर । १ जानेवारी २०२३
देशातील मोदी सरकार महागाई दूर करण्यासाठी सत्तेवर आले असतांना गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात महागाई होत आहे. याचेच प्रत्यय नेहमी येत आहे. हे सरकार महागाई दूर करण्यासाठी आले कि महागाई अजून वाढ करण्यासाठी हे आतापर्यत सर्वसामान्य जनतेला समजेनासे झाले आहे. नवीन वर्ष 2023 आजपासून सुरू झाले आहे. नववर्षासोबतच सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी 1 जानेवारी 2023 रोजी गॅस सिलेंडरच्या नवीन किंमती जाहीर केल्या आहेत.
विशेष म्हणजे गॅस सिलेंडरच्या दरात 25 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. ही वाढ व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत करण्यात आली असून घरगुती गॅस सिलेंडर जुन्या दरात उपलब्ध आहेत. राजधानी दिल्लीत आज व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच 1 जानेवारी 2023 पासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्याचबरोबर घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अशा स्थितीत गृहिणींचे बजेट बिघडणार नसून, व्यावसायिक गॅस सिलेंडर महाग झाल्याने रेस्टॉरंट, हॉटेल मधील खाद्यपदार्थ महाग होऊ शकतात. नवे दरही आजपासून लागू झाले आहेत.
व्यावसायिक सिलेंडरचे दर-
दिल्ली – 1769 रुपये प्रति सिलेंडर
मुंबई – 1721 रुपये प्रति सिलेंडर
कोलकाता – 1870 रुपये प्रति सिलेंडर
चेन्नई – 1917 रुपये प्रति सिलेंडर
घरगुती गॅस सिलेंडरचे दर –
दिल्ली – 1053 रुपये प्रति सिलेंडर
मुंबई – 1052.5 रुपये प्रति सिलेंडर
कोलकाता – 1079 रुपये प्रति सिलेंडर
चेन्नई – 1068.5 रुपये प्रति सिलेंडर
