जळगाव मिरर | 22 एप्रिल 2024
जळगांव लोकसभा मतदार संघासाठी 1 अपक्ष व रावेर लोकसभा मतदार संघासाठी 04 अपक्ष उमेदवारांचे अर्ज दाखल
जळगांव दि.22( जिमाका ) लोकसभा निवडणूक 2024 ची अर्ज दाखल करण्याची सूचना 18 एप्रिल रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर चौथ्या दिवशी दि.22 एप्रिल रोजी 03 जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी
09 उमेदवारांनी 22 अर्ज घेतले. तर 04 रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 08 उमेदवारांनी 24 अर्ज घेतले. तर चौथ्या दिवशी जळगाव लोकसभा मतदार संघासाठी मुकेश मुलचंद कोळी या अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी संजय प्रल्हाद कांडेलकर, मुक्ताईनगर (अपक्ष )यांनी 03 उमेदवारी अर्ज दाखल केले. तर प्रवीण लक्ष्मण पाटील, मलकापूर या अपक्ष उमेदवाराने एक अर्ज दाखल केला. असे जळगांव व रावेर लोकसभा मतदार संघात सोमवारी एकूण 05 अर्ज दाखल झाले.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची नामनिर्देशन दाखल करण्याची सूचना प्रसिद्ध झालेंनंतर दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयातून 03 जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 09 उमेदवारांनी 22 अर्ज घेतले आहेत. त्यात जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी सचिन विष्णू घोडेस्वार, जळगाव ( अपक्ष) 02, प्रदीप भीमराव मोतीराया चांदसर ता. धरणगाव (अपक्ष ) 02,प्रदीप भीमराव मोतीराया यांनी सुनंदाबाई भीमराव मोतीराया( भारतीय प्रजा सुराज्य पक्ष) 02, विलास देवराम कोळी, कळमसरे, ता. अंमळनेर ( अपक्ष) 04, किरण ब्रिजलाल कोळी, जळगाव( अपक्ष) 03,दीपक सुखदेव सोनार,जळगाव यांनी लीना शाम पाटील ( अपक्ष) 04, ज्ञानेश्वर मगनपुरी गोसावी, जळगाव( आम जनता पार्टी) 02, इनेश एकनाथ राठोड, लोंजे ता. चाळीसगाव ( अपक्ष) 01, गौरव दामोदर सुरवाडे, जळगाव ( अपक्ष) 02 असे एकूण 09 उमेदवारांनी 22 अर्ज घेतले आहेत.
04 रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 08 उमेदवारांनी 24 अर्ज घेतले आहेत. त्यात मनोज नामदेव चौधरी, भुसावळ ( अपक्ष)02, शेख इम्रान शेख बिस्मिल्ला, मलकापूर ( अपक्ष) 04, श्रावण काशिनाथ डहाळे, राजुरा, मुक्ताईनगर (अपक्ष ) 02, उमेश दत्तात्रय पाटील, ममुराबाद यांनी रवींद्र प्रल्हादराव पाटील, मानूर,बोदवड ( राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट) यांच्यासाठी02,राहुल बापू साळुंके, किनगाव यांनी जगन देवराम सोनवणे, भुसावळ(अपक्ष )यांचेसाठी 04, विजय मधुकर साळुंके, किनगाव यांनी सौं. पुष्पाताई जगन सोनवणे, भुसावळ (अपक्ष ) यांच्यासाठी 04, गजानन रमेश रायडे, जामनेर (अपक्ष ) 04, शेख रमजान शेख करीम, भुसावळ यांनी नाजमीनबी शेख रमजान (सर्व समाज जनता पार्टी )02 असे एकूण 08 उमेदवारांनी 24 अर्ज घेतले आहेत.
अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी 03 जळगाव लोकसभा मतदारसंघा साठी मुकेश मुलचंद कोळी , शिरसोली, प्र. न, तालुका जळगाव या अपक्ष उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिकारी 03 जळगाव लोकसभा मतदारसंघ यांचेकडे जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी चा आपला उमेदवारी अर्ज सोमवार दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी दाखल केला.तर 04 रावेर लोकसभा मतदारसंघासाठी संजय प्रल्हाद कांडेलकर, मुक्ताईनगर (अपक्ष )यांनी 03 उमेदवारी अर्ज दाखल केले. तर प्रवीण लक्ष्मण पाटील, मलकापूर या अपक्ष उमेदवाराने एक अर्ज दाखल केला. सोमवार दिनांक 22 रोजी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 01 तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 04 असे एकूण 05 अर्ज सोमवारी दिवसभरात दाखल झाले.