
जळगाव मिरर । १० डिसेंबर २०२२
रामेश्वर कॉलनीत दोन तरुणांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी एकाला अटक केली. विशाल संजय पवार (२१, रा. मेहरुण) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
रामेश्वर कॉलनीमध्ये ४ डिसेंबर रोजी दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला झाला होता. याप्रकरणी तुषार सोनवणे, प्रतीक पांडुळे, दादू सपकाळे, नयन यवले, विशाल सोनवणे यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा झाला होता. शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या विजयसिंग पाटील, राजेश मेढे, जितेंद्र पाटील, अक्रम याकुब शेख, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, अविनाश देवरे, नितीन बाविस्कर यांनी प्राणघातक हल्ल्याप्रकरणी संशयित विशाल पवार याला सापळा रचून अटक केली. त्याला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.




















