जळगाव मिरर | २३ एप्रिल २०२४
धरणगाव तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील एका गावात शेतीच्या कामासाठी आलेल्या एका कुटुंबातील अल्पवयीन मुलीस तिच्या नातेवाईक असलेल्या महिलेने फुस लावून पळवून नेले आहे. या वेळी त्या महिलेने तिच्या नातेवाईक असलेल्या एका तरुणासह या मुलीला दुचाकीवरून पळवून नेले. तर त्या तरुणीला दहा दिवस डांबून ठेवले. या वेळी त्या तरुणाने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करून ही घटना कुणासही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. या बाबत पीडित मुलीच्या नातेवाईक असलेल्या महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी पाळधी पोलिसांनी तपास करून अनिल शिकाऱ्या उर्फ कालुसिंग पावरा (वय २३) यास शिरपूर तालुक्यातील वाकपाडा येथून अटक केली आहे. तर या प्रकरणात मीनाबाई सुकलाल बारेला ही महिला फरार आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाविरोधात बाल लैंगिक अत्याचार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, चोपडा येथीले पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनात पो.नि. उद्धव ढमाले, स.पो. नि. सचिन शिरसाठ, वसंत निकम, योगेश सोनवणे, अर्जुन कुवारे, विशाल सोनवणे आदींनी केली आहे. या प्रकरणाचा तपास पाळधी पोलीस करत आहेत.