जळगाव मिरर | २७ नोव्हेबर २०२४
रस्ता ओलांडतांना भरधाव कारच्या धडकेत सुनिल भिमसिंग पाटील (वय ४८, रा. सावखेडा होळ, ता. पारोळा) हे गंभीर जमखी झाले. त्यांच्यावर उपचार सुरु असतांना त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दि. २५ रोजी दुपारच्या सुमारास एरंडोल येथील राष्ट्रीय महामार्गावरील हिमालय पेट्रोल पंपा समोर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील सावखेडा होळ येथील सुनिल पाटील हे दि. २५ रोजी महामार्गावरुन जात असतांना रस्ता ओलांडत होते. यावेळी त्यांना (एमएच १२, यूडबल्यू ७३२७) क्रमांकाच्या भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असतांना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चालकाविरुद्ध एरंडोल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ किरण पाटील हे करीत आहे.