जळगाव मिरर | ५ ऑगस्ट २०२४
शहरातील शिवाजी नगर ते दुध फेडरेशनवरील मुख्य रस्त्यावर असलेल्या खडके चाळ परिसरात गेल्या ३० ते ३५ वर्षापासून सर्व समाज एकोप्याने वास्तव्यास असून दरवर्षी याठिकाणी गणेशोत्सव मोठ्या जल्लोशात साजरा करण्यात येत असतो. यंदा देखील खडके चाळ बहुउद्देशीय संस्था संचलित श्री गुरुदत्त उत्सव समिती मित्र मंडळाचे ३५ वे वर्ष असल्याने यंदा ‘एक उत्सव एक गणपती’चे विशेष आयोजन यंदा करण्यात आले आहे.
जळगावात ‘खडके चाळचा महाराजा’ म्हणून नावारूपाला आलेले श्री गुरुदत्त उत्सव समिती मित्र मंडळा यंदा २६ फुट उंच भव्य दिव्य बाप्पांची स्थापना करण्यात येणार असून नेहमीप्रमाणे यंदा देखील बुऱ्हानपूर शहातील सुप्रसिद्ध मूर्तिकार रोहित वैद्य हे खडके चाळच्या महाराजांची मूर्ती साकारणार आहे. नुकत्याच झालेल्या मंडळाच्या बैठकीत यंदाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यात अध्यक्षपदी राजेंद्र सूर्यवंशी, उपाध्यक्षपदी विजय लोखंडे तर खजिनदार मनोज तिळवणे, सचिव शशिकांत पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून मंडळाचे सर्वच कार्यकर्ते मेहनत घेत आहे.
११ हजार १११ दिव्यांची होणार महाआरती
यंदा बुऱ्हानपूर मधील सुप्रसिद्ध गोरक्षण सेना मंडळ यंदाच्या गणेशोत्सवातील दहा दिवसामध्ये ‘खडके चाळचा महाराजा’ ची महाआरतीचे नियोजन करणार असून दरवर्षी प्रमाणे यंदा देखील ११ हजार १११ दिव्यांनी महाआरती होणार असून यावेळी शहरातील दिग्गज मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.