जळगाव मिरर | २० सप्टेंबर २०२३
राज्यातील समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून नुकतेच मंगळवारी गौरी गणपतीसाठी पुण्याहून अमरावतीला जाणाऱ्या कारची वन्यप्राण्याला धडक बसल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघात झाल्यानंतर तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले कारमधून प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वाशिम जिल्ह्यातील वनोजा कारंजा दरम्यानच्या चॅनल क्रमांक 196 जवळ हा भीषण अपघात झाला आहे.
समृद्धी महामार्गावर वन्य प्राण्यांचा वावर अनेक वेळा दिसून आले. महामार्गावर वावर असलेले प्राणी अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. तर पुण्याहून अमरावतीला जाणाऱ्या दुरतकर कुटुंबीय गौरी गणपतीसाठी पुण्याहून अमरावतीला जात असतांनाच अचानक वन्यप्राणी रस्त्यावरील कठडे ओलांडून आले. अचानक समोर आलेल्या प्राण्यांमुळे हा भीषण अपघात झाला आहे. अमरावतीच्या दिशेने जात असताना कारच्या समोर अचानक जंगली प्राणी आला त्याला वाचवण्याच्या नादात कार तीन वेळा पलटी झाली. कारमधील तीन जण गंभीर जखमी झाले. तातडीने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात दरम्यान कारमधील महिलेचा मृत्यू झाला आहे. सुनंदा अनुज दुरतकर असं मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.