जळगाव मिरर / ६ नोव्हेंबर २०२२
महिलांसाठी भारतीय रेल्वेनं मोठी घोषणा केली आहे. लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाडीमध्ये बोगीमध्ये महिलांसाठी सहा जागा यापुढे राखीव ठेवण्यात येणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याची घोषणा केली आहे. याशिवाय रेल्वेमध्ये महिला प्रवाशांना आणखी काही सुविधा मिळणार आहेत. रेल्वेच्या या निर्णायामुळे महिलांना तिकिट आरक्षित करताना फायदा होणार आहे. त्याशिवाय इतर सुविधांमुळे प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे.
सुरक्षेसाठी प्लान तयार – लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये भारतीय रेल्लेनं Indian Railways) महिलांसाठी काही बर्थ आरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच महिलांच्या सुरक्षेसाठी खास प्लॅनही तयार करण्यात येणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये महिलांना आरामदायी प्रवास करताना यावा यासाठी भारतीय रेल्वेने (Indian Railways) बर्थ रिझर्व करण्यासोबत आणखी सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी खास उपाय योजना करण्यात येणार आहेत.
स्लीपर क्लास बोगीमध्ये सहा बर्थ आरक्षित – केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्स्प्रेस ट्रेनमध्ये (Mail and Express Trains)स्लीपर क्लास कोचमध्ये सहा बर्थ महिलांसाठी राखीव असतील. गरीब रथ (Garib Rath), राजधानी (Rajdhani), दुरंतोसह वातानुकूलित एक्स्प्रेस ट्रेनच्या थर्ड एसी कोचमध्ये (3AC class) महिला प्रवाशांसाठी (Female Passengers) सहा बर्थ राखीव असतील.
