जळगाव मिरर / २२ जानेवारी २०२३
राज्यातील उत्तम शिक्षण घेतलेले तरुण आज काही जिल्ह्यात बेरोजगार असताना दिसून येत आहे. यासाठी तब्बल ९ हजार पदाची मेगा भरती जाहीर झाली आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीद्वारे एकूण ९,३९४ पदे भरली जातील.
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला LIC च्या अधिकृत वेबसाइट licindia.in वरून ऑनलाइन अर्ज करता येईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख १० फेब्रुवारी २०२३ आहे.
महत्त्वाची तारीख
ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख – २१ जानेवारी २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० फेब्रुवारी २०२३
शैक्षणिक पात्रता – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी, शैक्षणिक पात्रतेचा तपशील भरती अधिसूचनेत दिलेला आहे.
वयोमर्यादा – सर्व अर्जदार उमेदवारांची वयोमर्यादा २१ वर्षे ते ३० वर्षे असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
अर्ज शुल्क – या पदांसाठी अर्ज करणार्या सामान्य श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी म्हणून ७५० रुपये भरावे लागतील, तर SC, ST प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून १०० रुपये भरावे लागतील.
निवड प्रक्रिया – LIC च्या या पदावर निवड होण्यासाठी, उमेदवारांना ऑनलाइन चाचणी आणि मुलाखतीच्या प्रक्रियेतून जावे लागेल. शॉर्टलिस्ट केल्यानंतर उमेदवारांना प्री-रिक्रूटमेंट मेडिकल टेस्टच्या प्रक्रियेतून जावे लागेल.