जळगाव मिरर | १० फेब्रुवारी २०२५
राज्यातील लोककला, लोकपरंपरा व लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे तसेच नवीन पिढीला आपल्या उच्च संस्कृतीची व परंपरेची ओळख व्हावी या उद्देशाने माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या अभिनव कल्पनेतून व , मा. मुख्यमंत्री, यांचे अपर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य श्री विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोड रावेर येथे दिनांक ११ ते १३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत वहीगायन महोत्सवाचेआयोजन करण्यात आले आहे.
खान्देश ची अस्सल लोककला वहीगायन
खानदेश हा लोककला आणि लोक साहित्याने समृद्ध असा प्रदेश आहे खानदेशातील सण,उत्सव, लोकोत्सव, मौखिक साहित्यातून निर्माण झालेली व परंपरेने चालत आलेले खानदेशी अस्सल लोककला म्हणजे वहीगायन खानदेशातील जळगाव धुळे नंदुरबार सह मराठवाडा विदर्भ व मध्य प्रदेशच्या खानदेशाच्या सीमा वरती गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोककलेचे सादरीकरण करणारे हजारो कलावंत या कलेचे जतन व संवर्धन करण्याचे कार्य अविरतपणे करीत आहे तथा हे लोकसाहित्य व लोककला काळ ओघात लुप्त होत चाललेले असताना या कलेचे जतन व संवर्धन व्हावे व नव्या पिढीला या कलेची ओळख निर्माण व्हावी या उद्देशाने राज्यशासन हा महोत्सव गत तीन वर्षापासून आयोजित आहे.
वही गायन महोत्सवात या वही मंडळांचा राहणार सहभाग,
११ फेब्रुबारीला बंबाळा (जि. बऱ्हाणपूर) येथील गायत्री वही मंडळ, बक्षीपूर (ता. रावेर) येथील गणेश वही मंडळ, रोटी (ता. नांदुरा जि. बुलडाणा) येथून वाल्मीक वही मंडळ सादरीकरण करेल.
१२ फेब्रुवारीला चाळीसगाव तालुक्यातील संतलीला कानबाई वही मंडळ, कळवाडी (ता. मालेगाव जि. नाशिक) येथील महादेव वही मंडळ, कापडणे (जि.धुळे) येथून कानबाई वही मंडळ सादरीकरण करेल. १३ फेब्रुवारीला जळगाव येथील वाल्मीक नगरमधील वाल्मिकी वही मंडळ, यावल येथून योगायोग वही मंडळ व एरंडोल येथील कानबाई वही मंडळ सहभागी होईल.
वाघोड येथील प्रसिद्ध सिताराम महाराज मुंजोबा यांच्या यात्रेच्या निमित्ताने आयोजित होत असलेल्या महोत्सवात खानदेशातील वही गायन लोककलावंतां सह कला रसिकांनी महोत्सवला उपस्थिती देऊन खानदेशातील अस्सल वही गायन लोककलेला दाद द्यावी असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे