जळगाव मिरर / ४ जानेवारी २०२३
नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले जवान फाउंडेशनतर्फे कमांडो ईश्वर मोरे ह्यांच्या वाढदिवसा निमित्त शुक्रवार दि.६ जानेवारी रोजी प्रभाग क्र. १ इंद्रप्रस्त नगर, राधाकृष्ण नगर, जळगाव व ०७ जानेवारी रोजी दैव योग मंगल कार्यालय, भडगांव रोड पाचोरा येथे मोफत महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
यात संपूर्ण हुदय तपासणी, इसिजी, 2 डी इको तसेच पोटाचे आजार, इतर सर्व क्रॉनिक आजार ह्यावर मोफत तज्ञ डॉक्टरकडून तपासणी करण्यात येणार आहे. तरी गरजू नी लाभ घ्यावा असे आवाहन जवान फाउंडेशन, जागृत जन मंच जळगाव तर्फे करण्यात आले आहे.
