जळगाव मिरर | २६ जानेवारी २०२४
गेल्या २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे श्रीराम प्रभु प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारतवासीयांना केले होते. त्यानंतर जळगाव जिल्ह्यात देखील हा उत्साह साजरा करण्यात येत असतांना काही समाजकंटकांनी उपद्रव माजविला, यातील संशयीत आरोपींना कठोर शासन व्हावे अशी मागणी मनसेतर्फे जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हणाले आहे कि, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात, गावागावात प्रभु श्रीरामाचे ध्वज, पताका, घरोघरी तर चारचाकी व दुचाकीवर ध्वज लावण्यात आले. याच गोष्टींचे एका काही समाजकंटकांना वाईट वाटून त्यांनी मुंबई येथील मिरा भाईंदर, यासह आपल्या जळगांव जिल्ह्यातील साबदा, रावेर व एरंडोल याठिकाणी हिंदू समाजा बांधवांचे घरावर दगडफेक करुन काही समाज बांधवांच्या दुचाकी व चारचाकी फोडून वातावरण गढूळ करण्याचे काम केले आहे. दोन समाजामध्ये नाहक वाद-विवाद निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. तरी आपणास आता या निवेदनाद्वारे इशारा देण्यात येतो की, अशा समाजकंटकांचा तात्काळ बंदोबस्त करावा अन्यथा यापुढे जर का अशा समाजकंटकानी असे उपद्रव केले तर संबधितांना म.न.से. स्टाईल्सने त्यांचेच भाषेत उत्तर देण्यात येईल. असे निवेदन पोलीस अधीक्षकांना दिले आहे.
निवेदनावर महानगराध्यक्ष विनोद शंकर शिंदे, महानगर उपाध्यक्ष आशिष सपकाळे, जिल्हा संघटक राजेंद्र निकम, शहर संघटक श्रीकृष्ण मंगळे, सीमा गोसावी, प्रशांत बाविस्कर, खुशाल ठाकूर, पंकज चौधरी, हरिओम सूर्यवंशी, सागर शिंपी, संजय मोती, प्रकाश जोशी यांच्यासह मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.