मेष राशी
श्रीगणेश म्हणतात की, कार्यक्षमतेच्या जोरावर तुम्ही अनेक कामे योग्यरित्या पूर्ण करू शकाल. कोणताही निर्णय व्यावहारिकरित्या घ्या, त्याचे चांगले परिणाम मिळतील. जोखमीच्या कामांमध्ये तुम्हाला विशेष फायदा होणार आहे. अफवांवर लक्ष देऊ नका. गैरसमजामुळे तुमचे त्रास वाढतील. रागावर नियंत्रित ठेवा. मित्रांबरोबर संबंध बिघणार नाहीत, याची काळजी घ्या. व्यवसायात नवीन योजनांना यश मिळेल.
वृषभ राशी
श्रीगणेश सांगतात की, कुटुंब आणि आर्थिक बाबींशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेतल्याने सकारात्मक परिणाम मिळू शकतात. तुमच्या आवडींसाठीही थोडा वेळ काढा. त्यामुळे तुम्हाला आध्यात्मिक आनंद मिळू शकतो. निर्णय घेण्यात जास्त वेळ घालवू नका अन्यथा यश तुमच्या हातातून निसटून जाईल. तुमचे बोलणे आणि हट्टी स्वभाव नियंत्रित करा.
मिथुन राशी
काही काळापासून सुरू असलेल्या कौटुंबिक समस्येवर आज तोडगा काढाल. आज एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी भेट होईल, त्यामुळे तुम्हाला स्वतःमध्ये नवीन जोम आणि ऊर्जा जाणवेल. तुमच्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. मुलांना काही निर्णय घेताना तुमच्या पाठिंब्याची आवश्यकता असते. त्यामुळे त्यात सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. व्यावसायिक कामांमध्ये निष्काळजीपणा बाळगू नका, असा सल्ला श्रीगणेश देतात.
कर्क राशी
श्रीगणेश सांगतात की, आजचा दिवस तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्याचा आहे. इतरांच्या सल्ल्याऐवजी तुमच्या निर्णयावर ठाम राहा. खर्च वाढला तरी उत्पन्नाच्या साधनात वाढ होईल. तुमच्या कुटुंबात आणि व्यवसायात कोणत्याही बाहेरील व्यक्तीला हस्तक्षेप करू देऊ नका. कर्मचाऱ्यांशी संबंध बिघडू नका. त्यांचा पाठिंबा तुमच्यासाठी आवश्यक आहे. व्यावसायिक ठिकाणी केलेल्या मेहनतीचे योग्य फळ न मिळाल्याने मनात थोडी चिंता असेल.
सिंह राशी
श्रीगणेश म्हणतात की, धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यातील सहभागाने तुमचे विचार सकारात्मक आणि संतुलित होतील. आर्थिक बाबतीतही मन आनंदी राहील. ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी अनुकूल आहे. चुकीच्या कामांमध्ये वेळ वाया घालवू नका. अतिआत्मविश्वास हानीकारक ठरेल. सासरच्यांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा.
कन्या राशी
श्रीगणेश सांगतात की, आज विद्यार्थ्यांना कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत चांगले निकाल मिळतील. स्वप्नपूर्तीसाठी कठोर परिश्रम करा. ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी अनेक शुभ संधी घेऊन येत आहे. आज कोणत्याही कारणास्तव काम टाळण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे अनेक कामे प्रलंबित राहू शकतात. तुमचे बोलणे मृदू ठेवा. वाईट शब्दांचा वापर तुमच्यासाठी नुकसानकारक ठरु शकतो. व्यवसायातील सहकाऱ्यांना कामात पूर्ण सहकार्य मिळेल.
तुळ राशी
श्रीगणेश म्हणतात की, आज कुटुंबातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद आणि पाठिंबा मिळेल. मुलांकडून सुरू असलेल्या कोणत्याही समस्येवर तोडगा काढल्याने मनःशांती देखील मिळू शकते. तुमच्या वैयक्तिक कामांवर योग्यरित्या लक्ष केंद्रित करू शकाल. राग आणि घाई तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी त्रासदायक ठरु शकते. तुमच्या या दोषांवर नियंत्रण ठेवा. खर्च जास्त असू शकतो. कर्मचाऱ्यांना वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
वृश्चिक राशी
आज मौजमजेकडे लक्ष न देता तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. घरात नवीन सजावटीसाठी काही योजना असतील. कुटुंबातील सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असेल. कोणतेही काम करताना निष्काळजी राहू नका. इतरांच्या बोलण्यात न अडकता तुमच्या निर्णयाला प्राधान्य द्या. कार्यक्षेत्रात जास्त काम असू शकते. पती-पत्नीमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता.
धनु राशी
श्रीगणेश म्हणतात की, आज तुमची कामे नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करा. तुमचा संपर्कक्षेत्रात वाढ करा. तुम्हाला नक्कीच यश मिळू शकते. मालमत्तेशी संबंधित कामे देखील फायदेशीर सौदे होऊ शकतात. आळस टाळा. अन्यथा काही यश हातातून निसटू शकते. जुन्या नकारात्मक बोलण्यामुळे नातेवाईकाशी संबंध बिघडू शकतात. व्यवसायात अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. प्रेमप्रकरणात भावनिक अंतर वाढू शकते.
मकर राशी
श्रीगणेश सांगतात की, गेल्या काही काळापासून करत असलेली कामे पूर्ण करण्याची वेळ आली आहे. तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला योग्य निकाल मिळेल. बाहेरील स्रोताकडून मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. तुमची महत्त्वाची कागदपत्रे सांभाळा. मार्केटिंगशी संबंधित कामे प्रलंबित राहण्याची शक्यता.
कुंभ राशी
विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक कामांमध्ये यश मिळेल. तुमच्या उर्जेचा पुरेपूर वापर करा. दुपारची परिस्थिती अधिक फायदेशीर होत आहे. कठोर परिश्रमामुळे नजीकच्या भविष्यात चांगले परिणाम मिळू शकतात. जास्त चर्चा करण्यात वेळ घालवू नका. तुमच्या योजना त्वरित सुरू करा. जनसंपर्क तुमच्यासाठी व्यवसायाचे नवीन स्रोत निर्माण करू शकतात.
मीन राशी
श्रीगणेश म्हणतात की, दिवसाच्या सुरुवातीलाच महत्त्वाच्या कामाची योजना बनवा. दुपारनंतर परिस्थिती खूप अनुकूल असल्याने तुमची कामे योग्यरित्या पूर्ण होतील. भावनेच्या आहारी जावून कोणताही निर्णय घेवू नका. घरातील वडीलधाऱ्यांनाही तुमच्या मदतीची आवश्यकता आहे, याची जाणीव ठेवा.