जळगाव मिरर | २७ फेब्रुवारी २०२५
जळगाव जिल्ह्यात कापूस हे प्रमुख पीक मानले जाते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात कापूस या पिकाची लागवड जळगाव जिल्ह्यात यंदाही केली गेली परंतु सुरूवातीला अतिपावसामुळे कापसाची वाढ झाली नाही. आणि कापूस काढणीवर आला तेव्हा परतीच्या पावसामुळे कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, अति पावसामुळे तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. उत्पन्नात ४० ते ५० टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात घट झाली.पीक वाचवण्यासाठी खर्च पण जास्त झाला त्यात शेतकऱ्यांना एकच आधार होता शासकीय हमी भाव तो पण बऱ्याच शेतकऱ्यांना मिळत नसल्याचं दिसून आले. आज शेतकऱ्याच्या घरात ४० ते ४५ टक्के कापूस घरात पडून आहे कवडीमोल भावात व्यापारी कापूस मांगत आहे. शेतकऱ्यानी आपला उदरनिर्वाह कसा चालवायचा याच पेचात शेतकरी सापडला आहे.
सीसीआय खरेदी केंद्रावर कापूस खरेदी चालू असताना खरेदी केंद्र का बंद करण्यात आले, जळगाव जिल्ह्याला लागून धुळे, बुलढाणा या जिल्ह्यात खरेदी केंद्र सुरू असताना आपल्याच जिल्ह्यात का बंद करण्यात आले. शेतकऱ्याचा अंत बघू नका शेतकरी काबाडकष्ट करतो आणि पीक पिकवतो त्याच्या मालाला योग्य भाव मिळावा हीच अपेक्षा शासनाकडून करतो. यात गैर काय आहे. सीसीआय केंद्र चालू करण्यात यावी अन्यथा मनसे स्टाईलने कापूस आंदोलन करण्यात येईल.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना जळगाव जिल्हाध्यक्ष अविनाश भास्कर पाटील, तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील, संदीप मांडोळे, विलास सोनार तालुका संघटक, देवेन्द्र माळी तालुका उपाध्यक्ष, हर्षल वाणी शहर सचिव, मनोज लोहार तालुका सचिव, अशोक कोळी यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.
