
जळगाव मिरर | २४ जानेवारी २०२४
राज्यातील अनेक शहरातून अल्पवयीन मुलीसोबत चुकीचे कृत्य केल्याच्या अनेक संतापजनक घटना समोर येत असतांना नुकतेच पालघर जिल्ह्यात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला मोबाईलमधील अश्लील फोटो दाखवून तिच्यासोबत अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तारापूर पोलीस ठाणे हद्दीतील एका शाळेतून धक्कादायक प्रकार समोर आला हाेता. त्यानंतर तारापूर पोलीसांनी शिक्षकावर गुन्हा दाखल करत त्याच्यावर कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनूसार एका शाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला मोबाईल मधले अश्लील फोटो दाखवून शिक्षकाने संबंधित विद्यार्थिनी सोबत अश्लील चाळे केले. त्याबाबतची तक्रार विद्यार्थिनीने तारापूर पोलीस ठाण्यात दिली. पाेलिसांनी घटनेचा तपास करीत संबंधित शिक्षकावर कलम 354 सह पाेक्साे कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर शिक्षकाला तारापूर पोलिसांनी अटक केली. तारापूर पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.