जळगाव मिरर | २२ सप्टेंबर २०२३
जामनेर तालुक्यातील एका गावातील बालवाडीत शिक्षण घेणाऱ्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पहूर पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात बालवाडी शाळा असून याठिकाणी परिसरातील लहान मुल शिक्षण घेण्यासाठी येत असतात. दि.२१ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास या शाळेच्या परिसरात संशयित आरोपी याने बालवाडी शाळेच्या विद्यार्थीनीच्या पाठीमागे हातवारे व इशारे करून त्यांना लज्जा उप्तन्न होईल असे कृत्य केले.
या प्रकरणी शाळेच्या उपशिक्षिका यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी विरोधात विनयभंग केल्या प्रकरणी पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पहूर पोलीस स्थानकाचे पोनि.सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील हे करीत आहेत.