
जळगाव मिरर | २६ मार्च २०२६
जळगांव तालुक्यातील भोकर येथे मोफत नेत्र तपासणी,मोतिबिंदू चिकित्सा,मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर याचे आयोजन यशस्वीरित्या करण्यात आले होते,या शिबिरात कांताई नेत्र संजीवनी योजना चा २०० पेक्षा जास्त लाभ रुग्णांनी घेतला.हे शिबिर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र भोकर येथे संपन्न झाले असून पंचक्रोशीतील रुग्णांनी येऊन आपल्या डोळ्याची तपासणी करून घेतली. तसेच मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी २४ रुग्ण जळगांव ला कांताई नेत्रालय येथे गेलेले होते त्यापैकी १० रुग्णांची मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. बाकीच्या रुग्णांना पुढील तारीख देण्यात आली आहे.
तरी भविष्यात कोणत्याही प्रकारच्या व्याधी असल्यास त्यांनी संपर्क साधावा असे आवाहन आयोजक प्रा.भाऊसाहेब सुकदेव सोनवणे ( उप जिल्हाप्रमुख,जळगांव जिल्हा ) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केले आहे.अधिक माहिती साठी मो.न. ९५६१८२०८५९ या क्रमांकावर संपर्क साधावा.सर्व सामान्य जनतेच्या आरोग्याच्या सेवेसाठी उचलेले पाऊल कौतुकाचा विषय ठरला असून पंचक्रोशीतील जनतेनी स्वागत केले आहे.
मोफत नेत्र तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उप तालुका प्रमुख अशोक पाटील,प्रभाकर कोळी,नंदलाल सोनवणे,दिलीप भागो बाविस्कर,हरीश पवार,दिलीप पवार,किशोर पवार,लोटन सोनवणे,संदीप पाटील,सुकदेव बाविस्कर,योगेश कोळी,धनराज वारडे,समाधान वाघ,विलास सोनवणे,एकनाथ सैंदाने यांनी मेहनत घेतली.




















