
जळगाव : प्रतिनिधी
पालकांनो आपल्या मुलाची तुलना इतर मुलांशी करू नका. त्यांना मोबाईल पासून दूर ठेवून पारंपरिक खेळात गुंतवा असे प्रतिपादन साहित्यिक एडवोकेट विलास मोरे यांनी केले. ते लोकशिक्षण मंडळ जळगाव संचालित, स्वा. सै. ज. सु. खडके प्राथमिक विद्यामंदिर, जळगाव. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ “शिवगंध २०२२” कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शाळा समिती चेअरमन सिंधुताई कोल्हे, पियुष कोल्हे, चिटणीस अवधूत पाटील का. उ. कोल्हे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गोसावी , व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. मान्यवरांचे बँड पथकाच्या गजरात स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान. . ऍड विलास मोरे साहित्यिक यांनी विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या चरित्राविषयी मार्गदर्शन केले. तसेच शिवारायांच्या बालपणीची गोष्ट सांगितली. व विद्यार्थ्यांकडून ‘जय भवानी जय शिवाजी’ असा जयघोष करून घेतला.
पियुषभाऊ कोल्हे यांच्या हस्ते इयत्ता ४ थी च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले “शिवप्रताप” या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले.
मुख्याध्यापक . संजय पाटील सर यांनी प्रास्ताविक सादर केले. यावेळी शाळेच्या विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेले विद्यार्थी तसेच शिक्षकांचा गौरव करण्यात आला. माता पालक संघातर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी बक्षिसे देण्यात आली.
याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित शिवारायांचा पाळणा, गोंधळ, अफजल खान वध पोवाडा, माय भवानी, राज्याभिषेक सोहळा, राज आल जिंकुनिया, इत्यादी कार्यक्रम सादर केले. पाहुण्यांनी कार्यक्रमातील विद्यार्थ्यांचे कोड कौतुक केले. याप्रसंगी विद्यार्थी व त्यांचे पालक तसेच निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. व शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुनम पाटील, व . शिला नारखेडे तसेच आभार . वंदना धुमाळ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, बंधू-भगिनी तसेच माता पालक संघाच्या सर्व सदस्या यांनी परिश्रम घेतले.




















