जळगाव मिरर | २९ जुलै २०२५
पारोळा तालुक्यातील कोळपिंप्री येथून चोरीला गेलेल्या दुचाकींचा गुन्हा पारोळा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. यातील दोन्हीही संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील कोळपिंप्री येथील अभय प्रवीण पाटील (वय १९) व नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्याच्या खडकी येथील मयूर तुळशीदास देवरे (वय २२) या दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, २१ जुलैला रात्री ११ वाजेनंतर कोळपिंप्री येथील ज्ञानेश्वर मच्छिद्र कोळी यांची ३५ हजारांची हिरो कंपनीची दुचाकी (एमएच- ५४, ए- २१९५) ही अज्ञात चोरट्याने चोरून नेले होती. याबाबत पारोळा पोलिसांत नोंद केली होती. दरम्यान, ही दुचाकी गावातील अभय पाटील व त्याचा साथीदाराने चोरी केल्याची पो.नि. सचिन सानप यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी हवालदार सुनील हटकर, प्रवीण पाटील, अनिल राठोड यांचे पथक तयार केले. यातील अभय पाटील हा अमळनेर शहरात लपलेला होता. त्याच्या मोबाईल नंबरच्या आधारावर त्याला पकडण्यात आले. तर त्याने साथीदार मयूर देवरे याच्याकडे ती दुचाकी असल्याचे सांगितले. त्यानंतर मालेगावात जाऊन मयूर देवरे याला ताब्यात घेतले. त्यानंतर दोन्ही आरोपींनी चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी दुचाकी जप्त केली आहे. तपास हवालदार सुनील हटकर करत आहेत.
