
जळगाव मिरर । १४ नोव्हेबर २०२२
शहरातील समता नगरातील रहिवासी असलेले समाधान रमेश जाधव (३४,) रिक्षात बसलेल्या तरुणाच्या खिशातून तिघांनी हातचलाखीने अडीच हजारांची रोख रक्कम लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रविवारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी रात्री साडेनऊ वाजता समाधान हा स्वातंत्र्य चौकातून रिक्षात बसला. यात आधीच तीनजण बसलेले होते. चारजण झाल्यामुळे व्यवस्थित बसता येत नसल्याने समाधान याने मला पुढे येऊ दे, असे चालकाला सांगितले. त्यानुसार चालकाने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ रिक्षा थांबवली. समाधान उतरल्यानंतर त्याला पुढे बसू देण्याच्या आधीच रिक्षा पळवली. यावेळी मागून आवाज देऊनही तो थांबला नाही. यावेळी घाईघाईत समाधान याने रिक्षाचा (एमएच १९, व्ही ६५९२) हा नंबर लिहिला. एका खिशातील एक हजार तर दुसऱ्या खिशातील दीड हजार व आधारकार्ड, पॅनकार्ड, लायसन्स अशा वस्तू असलेले पाकीट चोरीला गेल्याचे लक्षात आले.




















