जळगाव मिरर / ८ फेब्रुवारी २०२३
सुपरस्टार शाहरुख खानच्या ‘पठाण’ सिनेमामुळे अनेक वादंग उठले होते त्यानंतर हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाल्यापासून ते आज पर्यंत या चित्रपटाने नवा रेकॉर्ड बनविला असून कमाई थांबण्याचे नाव घेत नाही आहे. ‘पठाण’ चे बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी ‘पठाण’ने रिलीज होऊन दोन आठवडे पूर्ण केले आहेत, यासोबतच ‘पठाण’ने कमाईच्या बाबतीतही अनेक विक्रम केले आहेत. ‘पठाण’बाबत मोठे अपडेट्स समोर येत आहेत. ‘पठाण’ हा हिंदी सिनेसृष्टीतील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
25 जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ चित्रपटाने पहिल्या दिवसापासून कमाईच्या बाबतीत जबरदस्त कमाल दाखवला आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी ‘पठाण’ने जगभरात 100 कोटींची कमाई केली, शाहरुख खानचा हा चित्रपट येत्या काही दिवसांत नवे रेकॉर्ड करु शकतो. बुधवारी ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ‘पठाण’च्या लेटेस्ट कलेक्शनच्या आकडेवारीची माहिती दिली आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या म्हणण्यानुसार, ‘पठाण’ने रिलीजच्या 14 व्या दिवशी 7.50 कोटींचा गल्ला जमवला आहे, ज्यामुळे ‘पठाण’ हा हिंदी चित्रपटसृष्टीतील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. ‘पठाण’ने सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत दक्षिण सिनेमाचा ब्लॉकबस्टर सिनेमा KGF 2 ला मागे टाकले आहे. ‘पठाण’चे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन आता भारतातील सर्व भाषांमध्ये 446.02 कोटी आहे.
