जळगाव मिरर | २२ एप्रिल २०२४
चहार्डी-अकुलखेडा या रस्त्यावर चहार्डीपासून अर्धा अंतरावर किलोमीटर झालेल्या अपघातात पादचारी ठार झाला. चहार्डीमध्ये प्रवेश करणाऱ्या कमानीजवळ सकाळी ८ वाजेच्या दरम्यान शेतातून घरी परत पायी येत असताना दुचाकीने या पादचाऱ्याला धडक दिली. लोटन गणपत पाटील (६५, भोईवाडा चहार्डी) असे पादचाऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीचालक शुभम नरेंद्र महाजन (२४, चहार्डी) हा चहार्डीकडून अकुलखेड्याकडे जात होता. त्यावेळी रस्त्याने जाणारे लोटन पाटील यांना दुचाकीने जोरात धडक दिली. त्यात महाजन हा खाली पडला. त्यालाही जबर मार लागला आहे. त्याला अधिक उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे. दुचाकीने धडक दिल्याने लोटन पाटील हे पाच ते सहा फूट दूर फेकले गेले. त्यांच्या मेंदूला मार लागला होता. अधिक उपचारासाठी त्यांना धुळे येथे घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांना चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केले. जखमी शुभम महाजन याचा दि. २९ एप्रिल रोजी विवाह आहे, दरम्यान, मयत लोटन पाटील त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, मुलगा, सून, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. ते ललित, मेघशाम आणि शिक्षक जगदीश पाटील यांचे काका होत
