मेष राशी
श्रीगणेश म्हणतात की, आज तुम्ही तुमच्या कौशल्य आणि मेहनतीच्या जोरावर प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाऊ शकाल. लोक तुमच्या कार्याचे कौतुक करतील. भविष्यातील योजनांबाबत कुटुंबासोबत चर्चा होऊ शकते. आर्थिक बाबींवरून कुणाशी सौम्य वाद होऊ शकतो. व्यवसायातील गती मंद राहू शकते. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आरोग्यात थोडेसे चढउतार जाणवतील.
वृषभ राशी
श्रीगणेश सांगतात की, आजचा दिवस काहीसा अनुकूल असेल. तुम्ही तुमच्या विशेष कौशल्यांना सुधारण्यासाठी चांगला वेळ व्यतित कराल. विद्यार्थीवर्ग आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करेल. आर्थिक अडचणी आणि त्रास उभे राहू शकतात. पैसे खर्च करूनही समाधान मिळणार नाही. कुटुंबीयांचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. आरोग्य थोडेसे कमजोर राहू शकते.
मिथुन राशी
श्रीगणेश म्हणतात की, आजचा दिवस खूप व्यस्त असेल. भावनांपेक्षा व्यावहारिक राहून तुमचे कार्य पूर्ण करा. उधार दिलेले पैसे परत मिळविण्यासाठी योग्य वेळ आहे. जोडीदार आणि कुटुंबीयांकडून तुम्हाला भावनिक पाठिंबा मिळेल. आरोग्य चांगले राहील.
कर्क राशी
श्रीगणेश सांगतात की, सध्याच्या दिनचर्येत सामायिक होण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतील. एखादी चांगली बातमी मिळाल्यानंतर घरात आनंदाचे वातावरण असेल. नवीन माहिती मिळविण्यात वेळ जाईल. नकारात्मक विचारांमुळे नैराश्यासारख्या स्थितीला सामोरे जावे लागले.
सिंह राशी
आज मेहनतीच्या जोरावर तुम्ही परिस्थिती अनुकूल बनवाल. या मेहनतीचे योग्य परिणामही मिळतील. गुंतवणुकीसंबंधित विचारपूर्वक निर्णय घ्या. धर्म आणि कर्माशी संबंधित बाबींमध्ये तुमचा सहभाग असेल. विचलित मनावर नियंत्रण ठेवा. कोणताही निर्णय घेताना मन स्थिर ठेवा. आरोग्य उत्तम राहिल.
कन्या राशी
आज परिस्थिती काहीशी अनुकूल राहील. आजचा दिवस महिलांसाठी विशेष अनुकूल ठरेल. क्षमता आणि कौशल्याच्या जोरावर कोणतेही विशेष ध्येय साध्य करू शकतील. मालमत्तेशी संबंधित कोणत्याही गंभीर मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते.कोणताही निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका, असा सल्ला श्रीगणेश देतात.
तुळ राशी
श्रीगणेश म्हणतात, नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध दृष्टिकोनातून तुम्ही अनेक गोष्टी व्यवस्थित करू शकाल. राजकीय संबंध मजबूत होतील. मुलांच्या करिअरशी संबंधित कोणत्याही समस्येचे निराकरण मिळाल्याने मोठा दिलासा मिळेल. कधी कधी तुमच्या स्वभावातील चिडचिडेपणामुळे आणि नैराश्यामुळे अडचणी येऊ शकतात. घराचे वातावरण आनंददायी राहील.
वृश्चिक राशी
आजचा दिवस जास्तीत जास्त आध्यात्मिक क्रियाकलापांमध्ये व्यतीत होईल. तुम्हाला मानसिक शांतीही मिळेल. घराचे वातावरण सुखद ठेवण्यात तुमची विशेष भूमिका असेल. कोणत्याही विशेष मुद्द्यावर चर्चा होईल. मुलांवर खूप नियंत्रण ठेवू नका. त्यांच्यासोबत मैत्रीपूर्ण राहिल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढेल.
धनु राशी
श्रीगणेश सांगतात की, आज कुटुंबातील सदस्याच्या लग्नाविषयी चर्चा होऊ शकते. कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला तुमच्या कुटुंबात हस्तक्षेप करू देऊ नका. कधी कधी तुमचा अतिआत्मविश्वास तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकतो. वैयक्तिक कामांमुळे व्यावसायिक काम खोळंबणार नाही याची काळजी घ्या. आरोग्य उत्तम राहील.
मकर राशी
तुम्ही तुमचा जास्तीत जास्त वेळ वैयक्तिक आणि आवडीच्या कामांमध्ये व्यतित कराल. कोणत्याही परिस्थितीत संतुलन राखाल. नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींशी संबंधित कोणत्याही अप्रिय घटनेमुळे मनात निराशा राहील. व्यवसायात इंटरनेट आणि फोनद्वारे व्यापारी संबंध मजबूत करा. बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम जाणवेल.
कुंभ राशी
श्रीगणेश सांगतात की, कोणत्याही सामाजिक सेवा संघटनेविषयी सहकार्याची भावना अधिक मजबूत होईल आणि यामुळे तुम्हाला मानसिक व आध्यात्मिक शांती मिळेल. तुमचा एखादा जवळचा नातेवाईक किंवा मित्र तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करू शकतो. व्यवसायात आर्थिक बाबींवर विचार करण्याची गरज आहे.
मीन राशी
कोणत्याही विशेष मुद्द्यावर जवळच्या नातेवाईकाशी गंभीर चर्चा होईल. त्याचा सकारात्मक परिणामही मिळेल. इमारत बांधकामाशी संबंधित प्रलंबित कामांसंबंधी महत्त्वाचा निर्णय घेता येईल. कोणत्याही गैरसमजामुळे मनात शंका किंवा निराशेची स्थिती राहील. कार्यक्षेत्रात समजूतदारपणा आणि दूरदृष्टीने काम करण्याची गरज आहे.