मेष : व्यापाराच्या दृष्टीनं प्रवास कराल. देवाणघेवाणीचे व्यवहार होतील. आज देवाच्या चरणी लाल रंगाचं फूल अर्पण करा.
वृषभ : दिवस थकवणारा असेल. संध्याकाळच्या वेळी मित्रांची साथ तुम्हाला मिळणार आहे. आज एखादी शुभवार्ता कळेल.
मिथुन : कोणाचीही खिल्ली उडवू नका, ती वेळ तुमच्यावरही येऊ शकते हे विसरु नका. अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत करा.
कर्क : घरात वाद घालू नका. आज गुळ दान करा, शिवाष्टक वाचा. आजचा दिवस चांगला आहे.
सिंह : तुमची विचारसरणी बदला. आज इतरांशी संवाद साधताना वाणीवर ताबा ठेवा. एखादी शुभवार्ता कळेल.
कन्या : कामाचा व्याप वाढलेला असेल. आरोग्याची काळजी घ्या. आज गुरुची आराधना करा.
तुला : अती घाईमध्ये वाहन चालवू नका. याचकांना दान करा. आज मित्रपरिवाराची साथ मिळणार आहे.
वृश्चिक : आजचा दिवस थकवणारा असेल. नातेवाईकांची भेट होईल. मोठ्यांचा सल्ला मिळेल.
धनु : कोणत्याही गोष्टीची विनाकारण चर्चा करु नका. आज आरोग्याची काळजी घ्या. जुने मित्र भेटल्यामुळं आज तुम्ही गतकाळातील आठवणींमध्ये रमाल.
मकर : आजचा दिवस तुमच्या व्यवसायासाठी भरभराटीचा आहे. मोठ्यांचे आशीर्वाद आज फळणार आहेत.
कुंभ : प्रवासयोग आहे. एखाद्या ठिकाणी फिरायला जाण्याचा बेत आखाल. आज कुटुंबाला वेळ द्या.
मीन : कोणत्याही कामात आळस करु नका. आज एखादं नवं काम तुमच्या हाती येणार आहे. ते वेळेत पूर्ण करा, लाभ होईल.




















