मेष : आज तुम्हाला राजकीय संबंधातून फायदा होईल. तुम्ही तुमच्या प्रतिभा आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर काही निर्णय घ्याल. कुटुंबाच्या उदरनिर्वाहातही तुमचे उत्तम सहकार्य राहील. आपल्याबद्दलची कोणत्याही प्रकारची माहिती अनोळखी व्यक्तीला देऊ नका, अन्यथा कोणीतरी तुमचा विश्वासघात करू शकेल.विद्यार्थी अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करतील. आळसाला तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी असेल. आरोग्य उत्तम राहिल.
वृषभ : आज प्रलंबित आर्थिक व्यवहार मार्गी लागतील. महत्त्वाचे काम दिवसाच्या सुरुवातीलाच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला ग्रहांची स्थिती उत्तम राहील. दुपारनंतर अप्रिय सूचना मिळाल्याने घरात निराशा निर्माण होईल. तुमची कामे काळजीपूर्वक पूर्ण करा; थोडासा निष्काळजीपणा हानिकारक ठरु शकतो. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. पती-पत्नीचे नाते मधुर होऊ शकते. आरोग्य चांगले राहिल.
मिथुन : आज कुटुंबाशी संबंधित कोणतीही समस्या सोडवण्यासाठी तुमचा विशेष प्रयत्न असेल. तुम्हाला यशही मिळेल. दैनंदिन कामांव्यतिरिक्त आज थोडा वेळ स्वतःसाठी व्यतित करा. तुम्हाला नवीन ऊर्जा अनुभवूता येईल. एखादी जुनी समस्या तणाव निर्माण करु शकते. रागावर नियंत्रण ठेवा. आरोग्य उत्तम राहिल.
कर्क : तुम्ही ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करू शकता. तुमचा उत्साह कायम राहील. मनात जी काही स्वप्ने किंवा कल्पना आहेत त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. नकारात्मक क्रियाकलाप असलेल्या लोकांपासून दूर रहा. इतरांच्या कामात हस्तक्षेप करू नका. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कलात्मक आणि ग्लॅमर कामांशी संबंधित लोक यशस्वी होतील. घराची व्यवस्था योग्य राहील. आरोग्याची काळजी घ्या.
सिंह : आज बहुतांश वेळ सामाजिक कार्यात व्यतित कराल. तुमची कार्यक्षमता आणखी मजबूत होईल. मुलाच्या करिअरशी संबंधित समस्या सोडवण्यास महत्त्वाची व्यक्ती मदत करेल. कोणत्याही प्रकारा वाद घालू नका. स्वभावात संयम ठेवा. रागामुळे बिघडू शकतात. जोडीदाराला तुमचा भावनिक पाठिंबा मिळेल, आरोग्य चांगले राहिल
कन्या : तुमचा सकारात्मक दृष्टीकोन घर आणि व्यवसायात योग्य संतुलन राखेल. मालमत्तेसंदर्भातील योजना त्वरित सुरू करणे आवश्यक आहे. घरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन होईल. लवकरच यश मिळविण्यासाठी बेकायदेशीर कामे करू नका. तुमची कामे वेळेवर करा. इतरांमध्ये हस्तक्षेप केल्याने तुमची बदनामी होऊ शकते. व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन शोध किंवा योजना आवश्यक असतील. पती-पत्नीमधील गैरसमज दूर होऊ शकतात. वातावरण बदलाचा आरोग्यावर परिणाम होईल.
तूळ : आज व्यावसायिक प्रवास आर्थिकदृष्ट्या खूप फायदेशीर ठरेल. पूर्ण उर्जेने कामे कराल. कौटुंबिक वातावरणही शिस्तबद्ध ठेवता येईल. विद्यार्थी आणि तरुणांनी खोट्या मनोरंजनाच्या कामात वेळ वाया घालवू नये. घरातील वडीलधाऱ्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. व्यवसायात क्षेत्र योजनेचा गांभीर्याने विचार करा. पती-पत्नीमधील मतभेद दूर होतील. वातावरणाचा तब्येतील परिणाम होईल.
तूळ : आज व्यावसायिक प्रवास आर्थिकदृष्ट्या खूप फायदेशीर ठरेल. पूर्ण उर्जेने कामे कराल. कौटुंबिक वातावरणही शिस्तबद्ध ठेवता येईल. विद्यार्थी आणि तरुणांनी खोट्या मनोरंजनाच्या कामात वेळ वाया घालवू नये. घरातील वडीलधाऱ्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. व्यवसायात क्षेत्र योजनेचा गांभीर्याने विचार करा. पती-पत्नीमधील मतभेद दूर होतील. वातावरणाचा तब्येतील परिणाम होईल.
धनु : तुमची सकारात्मक विचारसरणी तुमच्यासाठी नवीन यश निर्माण करेल. काही खास लोकांच्या संपर्कात राहिल्याने तुमच्या विचारात आश्चर्यकारक बदलही होऊ शकतात. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून टीका निराशाजनक असू शकते. सध्याचा काळ यशस्वी होऊ शकतो. घरातील कामांमध्येही तुमचे सहकार्य कायम राहील. आरोग्य चांगले राहिल.
मकर : आज कठोर परिश्रमाच्या जोरावर यश मिळवाल. रागावर नियंत्रण ठेवा. थोडेसे नकारात्मक क्रियाकलाप असलेले लोक तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. कोणतेही षड्यंत्र यशस्वी होणार नाही. व्यवसाय आणि नोकरीचे महत्त्वाचे निर्णय स्वतः घ्या. कौटुंबिक वातावरण सामान्य राहिल. पोटाशी संबंधित समस्या दूर होऊ शकते.
कुंभ : आज योग्य समन्वय साधत कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. आसामाजिक कार्यात तुमचे योगदान देखील तुमचा सन्मान करेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या रागाचा सामना करावा लागू शकतो, त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. विद्यार्थ्यांनीही त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. घर-कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. आरोग्य उत्तम राहिल.
मीन : आज परिस्थितीत सकारात्मक बदल घडतील. सर्व कर्म भक्तिभावाने करण्याची इच्छा निर्माण होईल. मुलांबाबत कोणतीही चांगली बातमी मिळाल्याने दिलासा मिळेल. हलगर्जीपणामुळे महत्त्वाच्या कामात अडथळा निर्माण होईल. कौटुंबिक वातावरणात अशांतता राहिल. भावांसोबत दृढ संबंध ठेवा. हंगामी आजाराचा त्रास संभवताे.