मेष : नोकरीमध्ये प्रगती करण्याची संधी मिळणार आहे. घरच्या घरी तयार केलेलं अन्न खा. आपल्या माणसांना साथ द्या.
वृषभ : एखाद्या लहान कारणामुळं प्रवास करण्याचा योग आहे. कोणाशीही वाद घालू नका. इतरांना मान द्या.
मिथुन : नोकरीमध्ये बदल करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. आज धनलाभाचा योग आहे. बिघडलेले नातेसंबंध सुधारणार आहेत.
कर्क : वास्तव्यासाठी नवं घर खरेदी कराल. हा दिवस अविस्मरणीय असेल. उगवत्या सूर्याचं दर्शन घेत प्रार्थना करा, सर्व इच्छा पूर्ण होतील.
सिंह : जोडीदाराला पूर्ण आदर देत त्यांचे सल्ले घ्या. आज हेच सल्ले तुम्हाला पुढे नेणार आहेत.
कन्या : मित्रांसोबत फिरायला जाण्याचे बेत आखाल. वडिलांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करु नका, गरजूंची मदत करा.
तुळ : वैवाहिक आयुष्यात असणारी कटुता दूर होईल. नोकरीमध्ये असणाऱ्या अडचणी दूर होतील. आजचा दिवस शुभ आहे.
वृश्चिक : व्यवसायाणध्ये असणारा तणाव दूर होणार आहे. आपल्या माणसांसोबत वेळ व्यतीत करा. पाहुणे घरात येणार आहेत त्यांचं आदरातिथ्य करा.
धनु : विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष द्या. कर्जानं घेतलेले पैसे परत मिळणार आहेत. मित्रांसोबत वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल.
मकर : एखाद्या मोठ्या बदलाचा विचार तुम्ही करु शकता आयुष्याला कलाटणी देणारी घटना घडेल.
कुंभ : मित्रांशी वाद घालू नका. तुमच्या सर्व समस्या दूर होणार आहेत. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा.
मीन : मानसिकता बदला, आयुष्य बदलेल. आर्थिक संकटं दूर होणार आहेत. धैर्यानं काम करा.



















