
मेष राशी
श्रीगणेश म्हणतात की, आज संततीच्या भविष्यासाठीची योजना फलद्रूप होईल. सामाजिक कार्यात व्यस्तता वाढेल. घरातील वडीलधाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. नवीन नोकरीची संधी मिळेल. पती-पत्नीमधील सुसंवाद कायम राहील. वाहन चालवताना काळजी घ्या.
वृषभ राशी
श्रीगणेश सांगतात की, आज तुमच्या इच्छा पूर्ण होतील. नियोजनानुसार नवीन कामे पार पडतील. तुम्हाला सर्वांचे सहकार्य लाभेल. आत्म-विश्लेषण करून तुमचे व्यक्तिमत्व सुधारण्याचा प्रयत्न करा. विमा आणि कमिशनशी संबंधित कामात अधिक यश मिळेल. पती-पत्नीमध्ये मतभेद होण्याची शक्यता. आरोग्याची काळजी घ्या.
मिथुन राशी
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला ताण आज दूर होऊ शकतो. कोणतेही महत्त्वाचे काम करण्यापूर्वी तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्या. मुलाच्या करिअरबद्दल कोणतीही माहिती मिळाल्याने घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. आज कुठेही पैसे गुंतवू नका, असा सल्ला श्रीगणेश देतात. कुटुंबातील सदस्यांची एकमेकांप्रती सहकार्याची भावना आणि समर्पण यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील.
कर्क राशी
आर्थिक प्रश्न मार्गी लावण्यात हा काळ सर्वोत्तम आहे. तुम्ही तुमच्या विचारसरणीने आणि बुद्धिमत्तेने प्रत्येक समस्येवर उपाय शोधू शकाल. अध्यात्मिक कार्यक्रमातील सहभागाने मनःशांती लाभेल. कार्यक्षेत्रात काम करण्याचा तुमचा उत्साह प्रचंड असेल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद राखाल. गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या आरोग्य समस्यांवर आराम मिळेल.
सिंह राशी
श्रीगणेश सांगतात की, तुम्हाला मानसिक शांती मिळेल. नातेवाईक आणि शेजाऱ्यांशी संबंध सुधारतील. राग आणि हट्टीपणा सारख्या नकारात्मक गोष्टी तुमच्या काही कृती बिघडू शकतात, याची जाणीव ठेवा. उत्पन्नाच्या स्रोतात थोडासा दोष असू शकतो. पती-पत्नीमध्ये मतभेद होतील. सध्याच्या वातावरणात आरोग्याची काळजी घेंणे हितावह ठरेल.
कन्या राशी
श्रीगणेश सांगतात की, तुम्ही काही महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. आर्थिक परिस्थिती समाधानकारक होईल. तुमच्या ध्येयासाठी पूर्णपणे समर्पित रहा. चुकीच्या खर्चावर नियंत्रण ठेवा. पती-पत्नी एकमेकांना सहकार्याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करतील. काही काळापासून सुरू असलेल्या आरोग्याशी संबंधित समस्येपासून तुम्हाला आराम मिळू शकतो. तर आज बेरोजगारांना व्यवसायाची संधी मिळणार.
तुळ राशी
आज काही वेळ आत्मचिंतनात व्यतित करा. यामुळे तुम्हाला दैनंदिन त्रासांपासून मुक्ती मिळू शकते. कुटुंबाच्या गरजांकडे दुर्लक्ष करू नका. त्यांची काळजी घेणे ही तुमची सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे, असा सल्ला श्रीगणेश देतात. व्यापारातील परिस्थिती सामान्य राहील. घरातील वातावरण आनंदी राहील. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील.
वृश्चिक राशी
श्रीगणेश म्हणतात की, तुमच्या आर्थिक योजनेशी संबंधित कामांकडे अधिक लक्ष द्या. ते तुमच्या भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापासून टाळा. व्यवसायाच्या ठिकाणी तुमची उपस्थिती आवश्यक असेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. ताणतणाव टाळा.
धनु राशी
श्रीगणेश सांगतात की, सकारात्मक लोकांसोबत वेळ व्यतित केल्याने संपर्क क्षेत्रात वाढ होईल. तुम्हाला भावनिकदृष्ट्या सक्षम वाटेल. तुमच्या विवेकबुद्धीने सर्व समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात इच्छित परिणाम मिळू शकतो. पती-पत्नीचे नाते मधूर होईल.
मकर राशी
श्रीगणेश म्हणतात की, कोणत्याही प्रकारच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे. प्रयत्न करत राहा. गेल्या काही वर्षांपासून तुम्ही आखलेल्या ध्येयांना साध्य करण्याची हीच वेळ आहे. तुमच्या उदारतेचा गैरवापर देखील होऊ शकतो, याची जाणीव ठेवा. आर्थिकदृष्ट्या थोडीशी समस्या उद्भवू शकतात. आरोग्य चांगले राहील.
कुंभ राशी
श्रीगणेश सांगतात की, आर्थिक बाबतीत आजचा दिवस अनुकूल आहे. कोणाशीही जास्त वाद घालू नका. त्यामुळे तुमची बदनामी देखील होऊ शकते. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. व्यवसायातील सर्व काम व्यवस्थित सुरु राहतील. जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य तुमचे मनोबल राखेल. पोटविकाराचा त्रास होण्याची शक्यता.
मीन राशी
अडथळ्यांना न जुमानता तुम्ही महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. सकारात्मक लोकांसोबत थोडा वेळ घालवल्याने तुम्हाला मानसिकदृष्ट्या खूप आराम मिळेल. आज कामाच्या ठिकाणी काही अडथळे येऊ शकतात. जोडीदारांमधील गैरसमज बाहेरील व्यक्तीमुळे होऊ शकतात. खोकला, ताप यासारख्या समस्या वाढू शकतात.