मेष राशी
श्रीगणेश म्हणतात की, काळ थोडा आव्हानात्मक असेल. मात्र, आपल्या बुद्धिमत्ता आणि मेहनतीच्या जोरावर तुम्ही परिस्थितीला सामोरे जाल. लोक तुमच्या कामाचं कौतुक करतील. भविष्यातील योजना यावर कुटुंबात काही चर्चा होऊ शकते. आर्थिक बाबतीत कोणाशी तरी सौम्य मतभेद होऊ शकतो. व्यवसायात उलाढल कमी राहील. कुटुंबाचे वातावरण आनंददायी राहील. आरोग्यात चढ-उतार संभवतात.
वृषभ राशी
श्रीगणेश सांगतात की, आजचा काळ थोडासा अनुकूल असेल. कौशल्य विकासावर तुमचा भर असेल. नातेवाईकांबरोबर झालेली चर्चा लाभदायक ठरेल. विद्यार्थीवर्ग आपल्या ध्येयपूर्तीसाठी मेहनत करेल. आर्थिक अडचणी आणि त्रास संभवतात. पैसे खर्च करूनही समाधान मिळणार नाही. कुटुंबातील लोकांचा पूर्ण पाठिंबा लाभेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
मिथुन राशी
आजचा दिवस खूप व्यस्त असेल. भावनेपेक्षा वास्तववादी राहून तुमची कामं पूर्ण करा, निर्णय घेणं सोपं जाईल. उधार दिलेले पैसे परत मिळवण्याचा योग्य काळ आहे. जुन्या नकारात्मक गोष्टींमुळे आजचा दिवस खराब करु नका. व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय काळजीपूर्वक घ्या. जोडीदार आणि कुटुंबीयांचा पाठिंबा मिळेल. आरोग्य चांगले राहील.
कर्क राशी
श्रीगणेश म्हणतात की, दिनक्रमात काही बदल करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील; पण त्यात यश मिळेल. एखाद्या चांगल्या बातमीमुळे घरात आनंदाचे वातावरण असेल. नवीन माहिती मिळवण्यात वेळ जाईल. घरातील समस्या शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा. घरकामात मदत, सर्वांची काळजी घेणे यामुळे वातावरण सुखद राहील. नकारात्मक विचारांमुळे नैराश्यासारखी स्थिती निर्माण होऊ शकते.
सिंह राशी
मेहनतीच्या जोरावर तुम्ही परिस्थिती आपल्या बाजूने करू शकाल. या मेहनतीचे योग्य फलितही मिळेल. गुंतवणुकीच्या बाबतीत घाई करू नका. धर्म आणि कर्म याच्याशी संबंधित कामातही तुमचा सहभाग असेल. जवळच्या नातलगांशी वारसाहक्काच्या मालमत्तेवरून वाद वाढू शकतो. निर्णय घेताना मन शांत ठेवा, असा सल्ला श्रीगणेश देतात. आरोग्य उत्तम राहील.
कन्या राशी
आजचा दिवस विशेषतः महिलांसाठी अनुकूल आहे. त्यांच्या कौशल्य आणि प्रतिभेमुळे एखादे विशेष लक्ष्य गाठता येईल. मालमत्तेशी संबंधित गंभीर विषयावर चर्चा होऊ शकते, याचे परिणाम सकारात्मक असतील; पण कोणताही महत्त्वाचा निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. वैवाहिक नातं गोड राहील.
तुळ राशी
श्रीगणेश सांगतात की, तुमच्या नियोजित आणि शिस्तबद्ध दृष्टिकोनामुळे तुम्ही अनेक गोष्टी योग्य प्रकारे पूर्ण करू शकाल. संपर्कक्षेत्रात झालेली वाढ लाभदायक ठरेल. मुलांच्या करिअरसंबंधी अडचणीचे समाधान मिळणे तुम्हाला मोठा दिलासा देईल. घराचे वातावरण आनंदी राहील.
वृश्चिक राशी
आज आध्यात्मिक कार्यात सहभागाने मानसिक शांतता लाभेल. घराच्या सुखद वातावरण राखण्यात तुमची विशेष भूमिका असेल. एखाद्या विशेष मुद्द्यावर चर्चा होईल. मुलांवर फारसं नियंत्रण ठेवू नका. त्यांच्याशी मैत्रीपूर्ण वागणं त्यांच्या आत्मविश्वासात भर घालेल. जुनी मैत्री प्रेमसंबंधात रूपांतरित होऊ शकते.
धनु राशी
कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या लग्नाविषयी चर्चा होऊ शकते. कोणत्याही बाहेरील व्यक्तीला कुटुंबीय प्रकरणांत हस्तक्षेप करू देऊ नका. तुमचा अतिआत्मविश्वास तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. वैयक्तिक कामांमुळे व्यवसायातील कामे प्रलंबित राहण्याची शक्यता. आरोग्य उत्तम राहील.
मकर राशी
आज बहुतांश वेळ वैयक्तिक आणि आवडीच्या कामांमध्ये व्यतित कराल. यामुळे नवीन ऊर्जा मिळेल. कोणत्याही परिस्थितीत समतोल राखाल. नातलगांशी संबंधित एखाद्या अप्रिय घटनेमुळे मनात निराशा येईल. व्यवसायात इंटरनेट आणि फोनद्वारे व्यावसायिक संबंध दृढ करा.
कुंभ राशी
श्रीगणेश सांगतात की, एखाद्या सामाजिक सेवाभावी संस्थेबाबत सहकार्याची भावना वाढेल. त्यामुळे मानसिक आणि आध्यात्मिक शांतता मिळेल. जवळचा एखादा नातलग किंवा मित्र तुमचा प्रतिमेवर परिणाम घडवण्याचा प्रयत्न करू शकतो. व्यवसायात आर्थिक बाबींवर अधिक विचार करण्याची गरज आहे.
मीन राशी
श्रीगणेश म्हणतात की, जवळच्या नातलगाशी एखाद्या विशेष विषयावर गंभीर चर्चा होईल, ज्याचे सकारात्मक परिणाम मिळू शकतात. घरबांधणीसंबंधी आज महत्त्वाचा निर्णय घेता येईल. कोणत्यातरी गैरसमजुतीमुळे मनात शंका किंवा नैराश्य येऊ शकते. कामाच्या ठिकाणी अधिक समजूतदारपणे काम करण्याची गरज आहे.
