
जामनेर : करन साळुंके
राज्याचे माजी महसूल मंत्री तथा आ.एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्याभरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून जामनेर तालुक्यातील वडगाव तीघ्रा येथे राष्ट्रवादी पार्टीतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.
जामनेर तालुक्यातील वडगाव तीघ्रामधील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या मैदानावर शंभर वृक्ष लागवड करून शाळेतील विद्यार्थ्यांना पेन वाटप करण्यात आली . यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष विलास राजपूत, तालुका सामाजिक न्याय उपाध्यक्ष दिलीप सोनवणे , ग्रामपंचायत सदस्य राहुल गायकवाड, अरुण ब्राह्मणदे , शाळा समितीचे अध्यक्ष ईश्वर सुरडकर, नाना तायडे, रतन जाधव, भैय्या चौधरी यांच्यासह राष्ट्रवादी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















