
पाचोरा : प्रतिनिधी
तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस ठाणे हद्दीतील तक्रादार शेतकऱ्यांने वर्षभरापूर्वी बैलगाडी भाड्याने दिल्यानंतर संबंधीतांनी ती परत दिली नाही उलट या प्रकरणात तक्रारदारावरच पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर शेतकऱ्याने तक्रार दाखल केली. या सर्व प्रकरणानंतर तक्रारदाराला बैलगाडी परत मिळवून देण्यासाठी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनचे पोलिस हवालदार राकेश खोंडे यांनी पाच हजार रुपयांची लाच मागितली मात्र तक्रारदाराकडे चार हजार रुपये असल्याने त्यावर तडजोड झाली.
तक्रारदाराने जळगाव ए.सी.बी. कडे तक्रार नोंदवल्यानंतर लाचेची दि. ४ आॅक्टोबर रोजी मंगळवारी पडताळणी झाल्यानंतर पाचोरा शहरातील एका चौकात तक्रारदाराला बोलावण्यात आल्यानंतर सापळा रचण्यात आला. एका चहाच्या टपरी व्यावसायीकाकडे लाचेची रक्कम देण्याचे सांगितल्यानंतर पथकाने आधी पाटील नामक चहा व्यावसायीकाला व नंतर आरोपी हवालदार राकेश खोंडे यास अटक केली. विशेष म्हणजे आरोपी हवालदार हा रजेवर असल्याची माहिती आहे.
यांच्या पथकाने केला सापळा यशस्वी जळगाव ए.सी.बी. चे पोलिस उपअधीक्षक शशीकांत एस. पाटील, निरीक्षक संजोग बच्छाव, ए. एस.आय. दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, नाईक मनोज जोशी, नाईक जनार्धन चौधरी, नाईक सुनील शिरसाठ, नाईक बाळू मराठे, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ, कॉन्स्टेबल राकेश दुसाने, कॉन्स्टेबल सचिन चाटे, कॉन्स्टेबल प्रणेश ठाकुर, कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.




















