
जळगाव मिरर | १ सप्टेंबर २०२५
रावेर तालुक्यातील निंभोरा येथील माजी ग्रामपंचायत सदस्य हाजराबाई हुसेन तडवी या महिलेने तिचे पती न्यू इंग्लिश स्कूल निभोराचे सेवानिवृत्त शिपाई हुसेन रसूल तडवी (वय ६५) यांचा कुऱ्हाडीने खून केला. ही घटना दि. ३० रोजी रात्री दहाच्या सुमारास निंभोरा येथील गणेश कॉलनी भागात घडली.
सविस्तर वृत्त असे कि, निंभोरा व परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की मृत हुसेन तडवी हा सतत त्यांची पत्नी हाजराबाई तडवी यांना मारहाण करून त्रास देत असे. या त्रासाला कंटाळून गणेश कॉलनी मधील आपल्या राहत्याघरात संतापाच्याभरात कुऱ्हाडीने मानेवर व डोक्यावर वार करून ठार केले. ही घटना दि. ३० रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास निंभोरा येथील गणेश कॉलनी भागात घडली. याबाबतची माहिती निंभोरा पोलीस ठाण्याचे पो. ना. अविनाश उत्तम पाटील यांनी दिल्याने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय फैजपूर पोलीस अधिकारी अनिल बडगुजर, सपोनी हरिदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभय ढाकणे, तसेच पोउनि दीपाली पाटील, पोनाका अविनाश पाटील व पोलीस करत आहे.
घटनेचे वृत्त पोलिसांना कळतात वरिष्ठ पोलीस अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांनी भेट दिली. त्यांनी निंभोरा पोलिसांना तपासाबाबत सूचना दिल्या. लागलीच सपोनी हरिदास बोचरे, पोलीस उपनिरीक्षक अभय ढाकणे, दीपाली पाटील व पोलिसांनी अधिक तपास करून खून करणाऱ्या महिला हाजराबाई तडवी यांना अटक केली आहे.
मृत हुसेन तडवी हे मूळ कुंभारखेडा येथील असून, गेल्या ४० वर्षांपासून निंभोरा येथे वास्तव्यास होते. न्यू इंग्लिश स्कूल याशाळेत शिपाई म्हणून नोकरीस होते व येथेच सेवानिवृत्त झाले. मृताची पत्नी आरोपी हाजराबाई तडवी यादेखील माजी ग्रा.पं सदस्य होत्या. मृताचे शवविच्छेदन रावेर रुग्णालयात करण्यात येऊन अत्यसंस्कार मूळगावी कुंभारखेडा ता. रावेर येथे करण्यात आले.




















